---Advertisement---

रावेर तालुक्यातील दुर्दैवी घटना : सहा दिवसांत विद्यार्थिनी पाठोपाठ विद्यार्थ्याचा मृत्यू

---Advertisement---

---Advertisement---

रावेर : तालुक्यात एकाच आठवठ्यात दोन विद्यार्थ्यांचा पाठोपाठ दुःखद घडली आहे. वाघोड येथील जिल्हा परिषद शाळेतील तिसरीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा शनिवारी (२६ जुलै) रोजी घरीच झोपेत अकस्मात मृत्यू झाला. या घटना घडण्यानेस केवळ सहा दिवस उलटत असताना ( ३१ जुलै) रोजी एका विद्यार्थांचा गव्हणीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

रावेर तालुक्यातील वाघोड येथील जि.प. प्राथमिक शाळेतील तिसरीतील विद्यार्थिनी आकांक्षा गणेश वैदकर (वय ९) हिने शनिवारी सकाळी शाळेत क्रीडा, नृत्य, काव्य सादरीकरण केल्यावर डोकं दुखवू लागल्याने तिला घरी सोडण्यात आले. तद्नंतर पालकांनी गावात प्रथमोपचार घेऊन घरी तिला विश्रांतीसाठी झोपविले असता दुपारी आजोबांनी चहा पिण्यासाठी उठविण्याचा प्रयत्न केला असता तिचा कोणताही प्रतिसाद लाभला नाही. यामुळे तिला रावेर येथील बालरोग तज्ज्ञांकडे नेले असता त्यांनी उच्चस्तरीय औषधोपचारासाठी जळगावला जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र वाटेतच तिचा करूण अंत झाला.

म्हशीच्या गोठ्यात विद्यार्थ्याचा मृत्यू


विद्यार्थिनीच्या मृत्यूच्या घटनेला सहा दिवस उलटत नाहीत तोच महाराष्ट्र विद्या मंदिर या माध्यमिक शाळेतील विद्यार्थी कल्पेश सुधाकर महाजन (वय १५) हा म्हशीच्या गोठ्यात साफसफाई करण्यासाठी गेला असता, म्हशीच्या चाऱ्याच्या गव्हाणीत तो गंभीर अवस्थेत पडल्याचे दूध ओढण्यासाठी आलेल्या दुग्ध व्यावसायिकाला आढळून आला. त्यास रावेर येथील एका खासगी रुग्णालयात हलवले असता तो मृत असल्याचे डॉ. योगेश पाटील यांनी घोषित केले. ही घटना ३१ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सुभाष वामन महाजन यांचा तो मुलगा आहे. ही घटना कशी घडली ? हे मात्र काळू शकले नाही.

दोन हृदयद्रावक घटनांनी हळहळ


गत सहा दिवसांदरम्यान दोन शालेय विद्यार्थ्यांच्या अकस्मात मृत्यूमुळे वाघोड गावात एकच हळहळ व्यक्त होत असून, शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताणतणाव वाढतोय का? असा सवाल उपस्थित केला जात असून, विद्यार्थ्यांच्या शालेय आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---