---Advertisement---
---Advertisement---
Jalgaon News : धावती एस. टी. बस रस्त्यालगत नाल्यात कोसळून ४० प्रवासी जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (१ ऑगस्ट) एरंडोल ते कासोदादरम्यान अंजनी धरणाजवळ घडली. एरंडोल आगाराची बस (एमएच २०, ई ४३०२) भडगावहून एरंडोल येत होती. एरंडोल एक ते दीड किलोमिटरवर असताना अंजनी धरणाजवळ एका नाल्यात बस उलटून अपघात झाला.
त्यानंतर भयभीत झालेल्या प्रवाश्यांच्या किंचाळण्याच्या आवाजाने परिसर भेदरला. प्रत्यक्षदर्शीनी घटनास्थळी धाव घेत बसच्या काचा फोडून जखमींना बाहेर काढले. त्यानंतर एरंडोल येथे रुग्णालयात हलविले. प्राथमिक उपचार करून अत्यवस्थ २८ रुग्णांना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ही आहेत जखमींची नवे
जखमींमध्ये तुळसाबाई रामदास पाटील (वय ७५), मनीषा सोनसिंग पाटील (वय २० दोन्ही रा. खडके, ता. एरंडोल), कलाबाई धनसिंग पाटील (वय ७५, विरावली, ता. यावल), किशोर झिपरू खैरनार (वय ४७, रा. आडगाव), कमलबाई भीमराव पाटील (वय ७०, रा. साईगव्हाण, ता. कन्नड), वैशाली ज्ञानेश्वर मराठे (वय २६, रा. भडगाव), सुनीता शंकर महाजन (वय ४६ रा. बहऱ्हाणपूर), समशाद बेगम शब्बीर मिर्झा (वय ६०, रा. भडगाव), अहिल्याबाई दशरथ पाटील (वय ६५, रा. एरंडोल), नवशादबी अयात पिरजादे (वय ४०, रा. भडगाव), फरीदाबाई शेख जाबीर कुरेशी (कासोदा), खटाबाई सतीश बाविस्कर (वय ३२, रा. वराड), धृपदाबाई पंडित महाजन (वय ६०, रा. पळासखेडा मिराचे), काफैया सलीम मणियार (वय ७०, रा. बोरनार), मैयदाबी कादर मणियार (वय ७०, रा. बोरनार), पुरुषोत्तम तुकाराम महाजन (वय २०, रा. आडगाव), शुभम राजेंद्र पाटील (वय २२, रा. आडगाव), मुशीरखान समशेरखान (वय ७५, रा. कासोदा), निर्मलाबाई चुडामण सोनवणे (वय ६५, रा. कासोदा), गोविंदा चुडामण सोनवणे (वय ३२, रा. कासोदा), बायजाबाई विठ्ठल पाटील (वय ५५, रा. सायगव्हाण), जिजाबाई आनंदा जाधव (वय ६५, रा. सावरगाव, ता. नादंगाव), दगूबाई आप्पाजी जाधव (वय ६०, रा. सावरगाव), सुरेंद्र राजेंद्र जाधव (वय ३५, रा. कासोदा), दीपाली दिलीप पाटील (वय ४२, रा. कासोदा), हुसेनाबी मुशीरखान (वय ६८, रा. कासोदा) तसेच अर्जुन बळीराम पाटील यांचा जखमींमध्ये समावेश आहे. यातील आठ जणांना फॅक्चर झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.