---Advertisement---
Indian Railways : साईनगर शिर्डी – काकीनाडा पोर्ट एक्सप्रेस सुधारित संरचनेसह चालवणार आहे, ज्यामध्ये ३ शयनयान श्रेणीचा समावेश असणार आहे.
ट्रेन क्रमांक 17205 / 17206 साईनगर शिर्डी – काकीनाडा पोर्ट एक्सप्रेस ही ट्रेन सुधारित संरचनेसह चालवणार आहे.
नवीन संरचनेमध्ये ३ शयनयान श्रेणीचा समावेश करण्यात आलेला आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहेत:
ट्रेन क्रमांक 17205 / 17206 साईनगर शिर्डी – काकीनाडा पोर्ट एक्सप्रेसची सुधारित श्रेणींची संरचना:
संरचना: १ प्रथम वातानुकूलित, २ वातानुकूलित द्वितीय, ४ वातानुकूलित तृतीय, २ वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी, ५ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ द्वितीय आसन व्यवस्था व सामान गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार.
ट्रेन क्रमांक 17205 साईनगर शिर्डी – काकीनाडा पोर्ट एक्सप्रेस ही सुधारित श्रेणींच्या संरचनेसह साईनगर शिर्डी टर्मिनस येथून १४.१०.२०२५ पासून चालवण्यात येईल.
ट्रेन क्रमांक 17206 काकीनाडा पोर्ट – साईनगर शिर्डी एक्सप्रेस ही सुधारित श्रेणींच्या संरचनेसह काकीनाडा पोर्ट येथून १३.१०.२०२५ पासून चालवण्यात येईल.
या गाड्यांच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी, रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.