---Advertisement---

Health News : चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस केंद्र, ग्रामीण भागातील पहिला उपक्रम

---Advertisement---

Health News : किडनीसारख्या आजाराने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य घरातील नागरिकांना तसेच रुग्णांना डायलिसिसची गरज पडते. आता आरोग्य विभागाकडून अशा रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. चाळीसगाव शहरातील धुळे रोडवरील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी शासनाकडून मोफत डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यात गेल्या सहा महिन्यांपासून पाच बेड सुरू करण्यात आले आहे.

आतापर्यंत ४५० वेळा डायलिसिस करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. आधी डायलिसिस करायचे असेल डायलिसिस सेवा चाळीसगाव शहरात सुरू झाल्यामुळे शहरातील तसेच तर खासगी दवाखान्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता व त्यासाठी अडीच ते तीन हजार रुपये खर्च येत होता. परंतु आता डायलिसिसची गरज असणाऱ्या रुग्णांना खासगी दवाखान्यात जाण्याची गरज भासणार नाही. कारण त्यांना चाळीसगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात अगदी मोफत सेवा असल्याने डायलीसिसच्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

ही सुविधा महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत असणार आहे. दरम्यान चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाने वर्षात १२३६ प्रसूती सुखरूप केल्याने राज्यात तिसरा क्रमांक मिळाला आहे. या यशाचे श्रेय प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. करंबळेकर, आरोग्य सेवक व कर्मचारी यांचेसह डॉ. वैदही पंडित यांना आहे.

  • चाळीसगाव रुग्णालयात कायदेशीर सेंटर सुरू केले, ही आनंदाची बाब आहे. यामुळे भडगाव, पाचोरा, पारोळा, नांदगाव, कन्नड या परिसरातील किडनीच्या आजाराने त्रस्त रुग्णांना याचा फायदा होणार आहे.
    डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---