चाळीसगाव रेल्वे स्थानकावर वंदे भारतला थांबा द्या : रयत सेनेची मागणी

---Advertisement---

 

चाळीसगाव : नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसला चाळीसगाव येथे थांबा मिळावा अशी मागणी रयत सेनेतर्फे भुसावळ डीआरएम यांना करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन चाळीसगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक यांच्यामार्फत देण्यात आले आहे.

वंदे भारत एक्सप्रेसला चाळीसगाव रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा नसल्याने हजारो प्रवाशांना या गाडीच्या सुविधेपासून वंचीत राहावे लागत आहे. नागपूर येथील अंजनी रेल्वे स्टेशन येथून सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी वंदे भारत एक्सप्रेस निघणार आहे. तिचे थांबे वर्धा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, पुणतांबा, दौड वरुन पुणे जाणार आहेत. मात्र, या एक्सप्रेसला चाळीसगावला थांबा देण्यात आलेला नाही. यामुळे ही एक्सप्रेस चाळीसगाव स्थानकावर न थांबता धावणार असल्यामुळे रेल्वे विभागाच्या विरोधात प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. चाळीसगाव येथून दररोज खाजगी ट्रॅव्हलने प्रवासी पुणे येथे जात असतात.

तसेच इतर रेल्वे गाड्यांच्या वेळा पुणे येथे जाण्यासाठी योग्य नाहीत. भुसावळ ते मनमाड या दोन्ही रेल्वे स्थानकांच्या मध्यवर्ती ठिकाणी चाळीसगाव रेल्वे स्थानक येते. येथुन हजारो प्रवासी प्रवास करतात. चाळीसगाव हे चार जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे. तालुक्यात पाटणादेवी सारखं देश पातळीवरचं प्रख्यात तीर्थक्षेत्र आहे. पुणतांबा सारख्या लहान रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेस थांबा आहे. तर चाळीसगाव हे मध्यवर्ती रेल्वेस्थानक असताना थांबा नसल्यामुळे प्रवाशांना या गाडीची सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे.

या एक्सप्रेसला चाळीसगावाला थांबा मिळाल्यास धुळे, मालेगाव, छत्रपती संभाजी गर तसेच चाळीसगाव येथील प्रवाशांना नागपूर व पुणे जाण्यासाठी सोयीस्कर होणार आहे. या एक्सप्रेसला भुसावळ विभागाचे डीआरएम यांनी रेल्वे प्रशासनाशी संपर्क करून चाळीसगाव रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसला थांबा मिळवून द्यावा.

खासदार स्मिता वाघ यांनी रेल्वे मंत्र्यांभेटून चाळीसगाव थांबा मिळावा याबाबत पाठपुरावा करावा. वंदे भारत एक्सप्रेसला थांबा न मिळाल्यास रयत सेना प्रवाशांना सोबत घेत येत्या ८ दिवसात चाळीसगाव रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन पुकारेल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रत आमदार मंगेश चव्हाण, खासदार स्मिता वाघ, जीआरएम, चाळीसगाव, आरपीएफ, चाळीसगाव यांना पाठविण्यात आल्या आहेत.

निवेदनावर रयत सेनेचे प्रदेश समन्वयक पी. एन. पाटील, प्रदेश सचिव प्रमोद वाघ , प्रदेश संघटक ज्ञानेश्वर कोल्हे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरुड, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, तालुका अध्यक्ष संजय हीरेकर, शहर अध्यक्ष प्रदीप मराठे, वाहतूक सेनेचे अध्यक्ष धनराज मराठे, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, भरत नवले, संघटक शिवाजी गवळी, कार्याध्यक्ष प्रकाश गवळी, संजय सोनवणे, अभिजीत शिंदे, मिलींद निकम, यशवंत जाधव, ऋषीकेश जाधव, प्रथमेश नवले, सागर देवरे, हर्षल गवळी, संतोष मोरे, केशव भोई, मनीष नवले, संदीप पाटील, भगवान चौधरी, आर डी सोनवणे, दीपक नागणे यांच्यासह रयत सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---