---Advertisement---
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी २०२३ साली विकासाच्या दृष्टिकोणातून उचलेलं हे पाऊल आज कुठेतरी महाराष्ट्रामध्ये टप्पाटप्प्याने वाढताना दिवस आहे. जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्हयात अनेक निवडणूक जिंकल्या असून, सर्व कार्यकर्ते चांगल्याप्रकारे काम करत आहेत. अशात आता प्रतिभा शिंदे यांची साथ मिळत आहे. यामुळे येणार काळ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल, असा विश्वास आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केला.
जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व लोक संघर्ष मोर्चाच्या वतीने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, क्रीडा व युवक कल्याणमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ हे उपस्थित आहेत.
अजित पवार यांचे अनंत उपकार उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यात झाले आहेत. शेळगाव बॅरेज, लेंडी प्रकल्प, सारंगखेडा बॅरेज, प्रकाशा बॅरेज, अक्क्कलपाडा धरण, पाडळसरे धरण, या सर्व प्रकल्पाला नवसंजीवनी देण्याचा काम आपल्या माध्यमातून झालं आहे.
यामुळे शेतकरी समाधानी झाला असून, येणाऱ्या काळामध्ये हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जे पूर्ण झाले नसतील ते त्या प्रकल्पाच्या माध्यमातून आमचा जिल्हा सक्षम होईल, असा विश्वासही आमदार पाटील यांनी व्यक्त केला.