---Advertisement---
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यंमत्री अजित पवार यांची आज जळगावात सभा पार पडली. यावेळी त्यांनी ”जय जोहार” म्हणत आपल्या भाषणाला सुरुवात केली. तसेच इतिहासाचा दाखला देत त्यांनी ”महापुरुषांनी कुठलाही जाती-धर्माचा भेदभाव न करता सर्वांना न्याय देण्याचं काम केलं”, या विचारातून सर्वांनासोबत घेत, न्यायचं देण्याचं काम सुरु आहे, असे प्रतिपादन केले.
जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व लोक संघर्ष मोर्चाच्या वतीने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, क्रीडा व युवक कल्याणमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ हे उपस्थित आहेत.
इतिहासाचा दाखला
महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे व छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी कधीही जाती, धर्म, पंथांमध्ये भेदभाव केली नाही.
या विचारातून माणुसकीच्या नात्याने ”आदिवासी, मागासवर्गीय, अल्प संख्यांक, बेरोजगार, कष्टकरी शेतकरी या सर्वांना बरोबर कसं नेता येईल, यासाठी प्रयत्न सुरु असून, सर्वांना न्याय देण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.