Nandurbar Crime : दुचाकीने नेत होते अमली पदार्थ, दोन जणांना अटक

---Advertisement---

 

नंदुरबार : शहादा शहरातील प्रकाशा रोडवर पोलिसांच्या पथकाकडून १० किलो गांजा जप्तीची कारवाई १५ ऑगस्ट रोजी दुपारी करण्यात आली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला आहे.

शहादा शहरातून मोटारसायकलीवर गांजाची वाहतूक सुरू असल्याची माहिती शहादा पोलिस ठाण्याच्या पथकाला मिळाली होती. यानुसार पथकाने प्रकाशा रस्त्यावरील एमएसईबी उपकेंद्राजवळ सापळा रचला होता. यादरम्यान दुपारी दुचाकीवरून (क्रमांक एमएच- १८, एबी १२६२) दोघे जण पोतडीमध्ये काहीतरी भरून नेत असल्याचे पोलिसांना दिसून आले होते. पथकाने हात देऊन मोटारसायकल थांबविली होती.

पोलिसांनी दोघांजवळील गोणी आणि बॅगांची तपासणी केली असता, त्यात १० किलो ६३२ ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता, खजान रतन पावरा (३०) व गोरख मगन पावरा (२४, दोघे रा. कोडीद, ता. शिरपूर, जि. धुळे) अशी दोघांची नावे असल्याचे समोर आले.

दोघांकडे गांजा विक्रीचा कोणताही परवाना नसल्याचे यावेळी समोर आले. पोलिसांनी मोटारसायकल आणि गांजा असा एकूण २ लाख ७२ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी खजान पावरा व गोरख पावरा या दोघांविरोधात शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलिस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार, पोलिस निरीक्षक नीलेश देसले, सहायक पोलिस निरीक्षक संदीप वाघ, पोलिस उपनिरीक्षक भुनेश मराठे, पोलिस नाईक दीपक चौधरी, भगवान साबळे, प्रदीप वाघ, विकास शिरसाठ, सचिन कापडे, विक्की शिंपी, नारायण कानडे यांनी ही कारवाई केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---