भागपूर उपसा सिंचन योजनेला वेग, मंत्री महाजनांकडून आढावा

---Advertisement---

 

जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी भागपूर उपसा सिंचन योजनेचे काम वेगाने प्रगतीत असून, या योजनेमुळे जळगाव, जामनेर व पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रकल्पाचा आढावा रविवारी (१७ऑगस्ट) आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी घेतला.

याप्रसंगी अभियंता व्ही. डी. पाटील, अधीक्षक अभियंता गो. श्रा. महाजन, कार्यकारी अभियंता प्र. पा. वराडे, उपअभियंता च. सु. खंबायत, सहाय्यक अभियंता रा. भ. पाटील उपस्थित होते. भागपूर उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाल्यानंतर जिल्ह्यातील शेतीचे भविष्य उज्ज्वल होईल, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी या वेळी व्यक्त केला.

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील लाभक्षेत्र १३,९०४ हेक्टर आहे. जळगाव तालुक्यातील २६ गावांना सिंचनाचा थेट फायदा होणार आहे. त्यात चिंचोली, कंडारी, उमाळे, पाथरी, धानवड, शिरसोली प्र. बो., दापोरे, जावखेडे, शिरसोली प्र. नो.. देव्हारी, कुऱ्हदडे, वराड खु.. वाकडी, वावदडे, रामदेववाडी, लोणवाडी खुर्द, वसंतवाडी, विटनेर, जळके, लोणवाडी बुद्रुक, बिलखेड, बिलवाडी, डोमगाव, सुभाषवाडी, वदली, वराड बुद्रुक या गावांचा समावेश आहे.

प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रस्तावित जलसाठा ९८.३५ दशलक्ष घनमीटर असून, लाभक्षेत्र १६,८६० हेक्टर आहे. जामनेर तालुक्यातील २२ लघु व २ मध्यम प्रकल्प, पाचोरा तालुक्यातील २० लघु व ३ मध्यम प्रकल्प, तर जळगाव तालुक्यातील २ लघु प्रकल्पांची तूट भरून काढली जाणार आहे. याशिवाय कांग प्रकल्पाची उंची वाढ, गोलटेकडी लघुपाटबंधारे प्रकल्प व एकुलती सा. त. प्रकल्पांचाही समावेश आहे.

शेतकऱ्यांना दिलासा

या योजनेमुळे जळगाव, जामनेर व पाचोरा तालुक्यातील शेतकरी थेट लाभार्थी ठरणार असून, सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पादनात मोठी भर पडणार उत्पन्न वाढणार आहे व कृषी आहे.

प्रकल्पाचा खर्च अन् सिंचन क्षेत्र

या योजनेची एकूण अंदाजित किंमत ३५३३.०५ कोटी इतकी असून, या योजनेतून ५ मध्यम व ४४ लघु प्रकल्पांचे स्थिरीकरण करण्यात येत आहे. प्रकल्पाचा एकूण जलसाठा १९२.६५६ दशलक्ष घनमीटर असून, ३० हजार ७६४ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---