‘अंनिस’चा बडगा पिटणाऱ्यांनो हिंमत असेल तर अन्य धर्मातील चालीरीतींवर बोलून दाखवाच…!

---Advertisement---

 

देशात कायदा व सुव्यवस्था आणि नागरिकत्वाचे नियम यांचे पूर्ण पालन झाले पाहीजे. परस्पर सौहार्द व सहकार्याची प्रत्तृत्ती समाजात सर्वत्र रुजली पाहिजे. समाजातील वाईट प्रथा नाहीशा करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले पाहीजे. भारतीय संस्कृती अतिशय प्राचीन आहे समाजातील सर्व घटक हे आपल्या कुटुंबातील आहेत हाच विचार ही संस्कृती रुजवते. अंधारातून प्रकाशाकडे समाजाचा प्रवास असावा याच भूमिकेची शिकवण रुजवली जाते. सनातन हिंदू संस्कृतीची मूल्ये शिकण्याची परंपरा समाजातील सर्वच घटकातून होईल, असा प्रयत्न हा शिकवितो. ‘स्व’पेक्षा अन्य धर्माचा विचार केवळ हिंदू धर्मच करू शकतो, हेदेखील तेवढेच सत्य. केवळ उपदेश करून उपयोग नसतो. स्वतः कृती करणे व सर्व समानता जोपासण्याचे अंगिकारणे हे गरजेचे असते.

मात्र बऱ्याच व्यक्तींचा समूह नेमके हेच विसरतो. काही संघटनांचा नेमका उद्देशच असा असतो की धर्म, संस्कृतीवर घाला घालणे, हिंदू धर्मियांच्या रूढी, परंपरांविरोधात सतत बोलत रहाणे, धर्मात तेढ निर्माण होणे असे बोलत रहाणे वगैरे. विशेष म्हणजे मूळ हिंदूच असलेली ही बांडगी मंडळी असे करत असते. यामुळे समाज मनात संतापाचे वातावरण निर्माण होत असते. आता हेच बधा ना यावल व धरणगाव येथे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या काही बांडगुळ्या मंडळीनी नुकतीच काही गरळ ओकली. असे सांगितले जात आहे की, या समितीच्या माध्यमातून शाळांमध्ये वैज्ञानिक जाणीवा अशी कार्यशाळा घेतली जात आहे.

विशेष म्हणजे राज्यातील सरकारच्या शिक्षण विभागाकडूनच त्यांना हे काम मिळाल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक शाळांमध्ये वैज्ञानिक जाणीवा या प्रकल्पांतर्गत कार्यशाळेमध्ये केवळ वैज्ञानिक विषयांवर चर्चा चर्चा होणे आवश्यक आहे. धर्माविषयी त्यात विधाने नसावीत मात्र या कार्यशाळेत नेमके याचकडे दुर्लक्ष करून नको ती मुक्ताफळे उधळली जात आहेत. धरणगाव येथे या मंडळींनी हिंदू संत, महंत व कयाकारांवर टीका करण्यात आली. भदाणे नामक इसमाने पंडीत प्रदीप मिश्रा, धीरेंद्र शास्त्री या सारख्या कथाकारांवर टीका केली. ते ढोंगी असल्याचा आरोप केला. प्रत्येक जण ‘अंनिस’ समर्थक असेलच असे नाही. याची प्रचिती या कार्यक्रमस्थळीदेखील आली काही धर्मप्रेमींनी या वक्तव्यांना तत्काळ आक्षेप घेतला. भदाणेंनी उधळलेली मुक्ताफळे कशी अयोग्य आहेत, हे सांगून त्यांनी शब्द मागे घ्यावेत असे सांगितले. ही सहनशिलता आमच्या हिंदू बांधवांमध्येच आहे….

दुसऱ्या धर्माबाबत अंनिसचा हा चेला बोलला असता तर त्याचे तत्काळ थोबाड रंगवले गेले असते. हिंदू धर्म आणि संत, महंतांविषयी वादग्रस्त विधानांमुळे वादात सापडलेल्या अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यशाळेला जिल्हा परिषदेच्या माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षणाधिकान्यांनी परवानगी दिलीच कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शाळांमधील चर्वेचा विषय वैज्ञानिक जाणिवा असा असताना तेथे देवी-देवतांचा विषय आलाच कसा? त्यामुळे हे सर्व प्रकार जाणीवपूर्वक केले जाताय असेच म्हणावे लागेल. मागे धुळे येथे काही खिश्चन महिला पुस्तके वाटप करताना आढळून आल्या होत्या. या धर्माबद्दल व त्यांच्या दैवताबद्दल त्यात माहिती होती व पुस्तक वाचल्यास तुमचे आजार दूर होतील, असे सांगितले जात होते. काही हिंदू संघटनांच्या कार्यकत्र्यांनी याला आक्षेप घेतल्यावर पोलिसांनी हस्तक्षेप करून त्या महिलांना समज देऊन तेथून हाकलून लावले. या प्रकारांबद्दत ही मंडळी काहीही बोलली नाही. आदिवासी ग्रामीण भागात काही ठिकाणी मुस्लिमांकडून हिंदूंना धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचीही उदाहरणे आहेत.

हिंदू युवतींना फसवून ‘लव्ह जिहाद सारखे प्रकार अनेक ठिकाणी होत असतात. स्वधर्म प्रसाराबाबत नाही नाही ते उद्योग केले जातात याकडे लक्ष देण्यास या मंडळींना वेळ नाही… याचे कारण तसा विरोध अन्य धर्मियांसाठी केल्यास जे काय भोगावे लागेल त्याचा विचार करून ही मंडळी शांत बसते… मग हिंदू धर्मियांबद्दल जर असे वारंवार होत असेल तर संयमाचा अंत पाहू नये असे सांगावेसे वाटते. शिक्षण विभागाने याप्रश्नी तत्काळ गंभीर दखल घ्यावी असे यानिमित्ताने वाटते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---