रा. स्व. संघाची ५ सप्टेंबरपासून जोधपूरमध्ये अखिल भारतीय समन्वय बैठक

---Advertisement---

 

यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक येत्या ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान राजस्थानातील जोधपूर येथे होणार आहे.
रा. स्व. संघाची तीन दिवसीय अखिल भारतीय बैठक दरवर्षी होते. मागील वर्षी ही बैठक केरळमधील पलक्कड येथे झाली होती. या बैठकीत संघाशी संबंधित ३२ संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

बैठकीत राष्ट्रीय एकात्मता, सुरक्षा आणि सामाजिक करण्यावरही भर दिला जाईल. दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण विषयांवर व्यापक चर्चा केली जाईल. सोबतच विविध विषयांवर कार्यरत राहण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न बैठकीत विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आपली माहिती सादर करतील आणि उपलब्धीविषयीदेखील सांगतील. संघ शताब्दीशी संबंधित कार्यात सहभागितेवरही या बैठकीत विचारमंथन अपेक्षित आहे.

बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्यासह सहा सह सरकार्यवाहदेखील उपस्थित राहतील. बैठकीला राष्ट्र सेविका समिती, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पार्टी, भारतीय किसान संघ, विद्या भारती, भारतीय मजदूर संघासह विविध संघ प्रेरित संघटनांचे राष्ट्रीय अध्यक्ष, संघटन मंत्री आणि प्रमुख पदाधिकारी सहभागी होतील, अशी माहिती अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---