जिल्ह्यातील प्रकल्पात ५७ टक्के उपयुक्त जलसाठा, चार मध्यम प्रकल्प पूर्ण, तर गिरणा, वाघूरची ७५ टक्क्यांकडे वाटचाल

---Advertisement---

 

जिल्ह्यात तीन मोठे, १४ मध्यम आणि ९६ लघू प्रकल्प आहेत. यापैकी जिल्ह्याच्या पूर्व भागातील सुकी आणि मोर तर पश्चिम भागातील मन्याड आणि अंजनी असे चार मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. तर मोठ्या प्रकल्पांपैकी गिरणा ७२.३६ आणि वाघूर ७३.९९ टक्के जलसाठा असून होत असलेली आवक लक्षात घेता हे प्रकल्प लवकरच पूर्ण क्षमतेने भरले जातील असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

जिल्ह्यात हतनूर, गिरणा आणि वाघूर असे तीन मोठे प्रकल्प असून हतनूर प्रकल्पात ४०.३९ टक्के साठा असून गेल्या २४ तासात ८९.४७ दशलक्ष घनमीटर अर्थात ३.१६ टिएम सी पाण्याची आवक झाली आहे. तसेच हतनूर प्रकल्पात पाण्याची होत असलेली आवक पहाता प्रकल्पाचे ४ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडून २२हजार ५९६ क्यूसेक प्रवाह नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

गिरणावरील पाच प्रकल्प ओव्हरफ्लो

गिरणा प्रकल्पाच्या वर नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे चणकापूर प्रकल्पात ८१.४८, अर्जुनसागर ८२.६४ टक्के जलसाठा आहे. तर ठेंगोडा बंधारा, हरणबारी, केळझर, नागासाक्या, आणि मन्याड प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून ओसंडले आहेत. या सर्व प्रकल्पातून गिरणा प्रकल्पात गेल्या २४ तासात सरासरी ४०१२ क्यूसेकनुसार ३.९२ दलघमी पाण्याची आवक झाली असून गिरणा प्रकल्पाची पाणी पातळी ७२.३५ टक्क्यांवर पोचली आहे. गेल्या सप्ताहात झालेल्या दमदार पावसामुळे जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर प्रकल्पात सद्यस्थितीत ७३.९९ टक्के जलसाठा झाला असून लवकरच प्रकल्प पूर्णत्वाकडे कडे पोचण्याची पोचण्याची शक्यता आहे.

लघू मध्यम प्रकल्पांमध्ये १३ दलघमीची आवक

जिल्ह्यातील १४ मध्यम आणि ९६ लघू प्रकल्प पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे बहुतांश प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे. यात मंगरूळ, सुकी, अंजनी मन्याड हे प्रकल्प शंभर टक्के पूर्ण भरले आहेत. तसेच अभोरा ८७.२२, मोर ७७.४१, अग्नावती १७.७१, हिवरा १६.६०, बहुळा ६१.४७, तोंडापूर ९०.२७, गुळ ५७.१४, भोकरबारी १६.९२, बोरी २७.३० आणि शेळगाव ३.८२ असा ८७७ दशलक्ष घनमिटर अर्थात ३०.९९ टिएमसीनुसार ५७.०७ टक्के उपयुक्त जलसाठा मोठ्या, मध्यम आणि लघू प्रकल्पात झाला आहे.

धुळे जिल्ह्याततीन प्रकल्प ओसंडले

धुळे जिल्ह्यात गतवर्षपिक्षा यंदा पावसाने सरासरी गाठली आहे. आतापर्यत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात १४ मध्यम प्रकल्पांपैकी ३ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून अन्य प्रकल्पात आवक समाधानकारक आहे.

जिल्ह्यातील १४ मध्यम आणि ४५ लघू प्रकल्प असून त्यात पांझरा, मालनगाव, जामखेडी हे तीन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून पांझरा प्रकल्पातून २४७, करवंद प्रकल्पातून ११५.१८ तर अक्कलपाडातून १३० तसेच अनेर प्रकल्पाचे ३दरवाजे अर्धा मिटरने उघडून ३२८० क्यूसेकचा विसर्ग केला जात आहे.

याशिवाय सुलवाडे प्रकल्पात १६.२५, टक्के जलसाठा असून प्रकल्पाचे ४ दरवाजे पूर्ण उघडून २८हजार ३१४.९० क्यूसेक तर सारंगखेडा प्रकल्पात २०.०४टक्के जलसाठा असून ७ दरवाजे उघडून ७० हजार ४७४ क्यूसेकचा विसर्ग केला जात आहे. मध्यम प्रकल्पापैकी कनोली २८.५२. बुराई ६१.२२, करवंद ८६.४२, अनेर ६१.८६, सोनवद १७.१३ आणि अमरावती ५४.०२, अक्कलपाडा ९१.०२, वाडीशेवाडी ४२.९१ आणि मुकटी १०० टक्के असा एकूण ५०.७० टक्के उपयुक्त जलसाठा आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---