---Advertisement---
Jalgaon Crime : बाहेर गावी जाण्यासाठी वाहनाची प्रतिक्षेत प्रवासी उभा होता. चालक त्याचे साथीदार इंडिका घेऊन त्यांच्याजवळ वाहन थांबविण्याचा बहाणा केला. त्यानंतर प्रवाश्याच्या खिशातून रोकड आणि मोबाईल असा सुमारे ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल काढुन पोबारा केला. शहरातील अजिंठा चौकातील इच्छादेवीकडे जाणाऱ्या बसस्टॉपजवळ ही घटना सोमवारी (२५ ऑगस्ट) दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी गुरुवारी (२८ ऑगस्ट) गुन्हा दाखल करण्यात आला.
अमोल रमेश बावस्कर (वय ४३, रा. पहुर, ता. जामनेर) यांना कामानिमित्त धुळे येथे जावयाचे होते. त्यानुसार ते अजिंठा चौकात ईच्छादेवीकडे जाणाऱ्या आणि महामार्गावरील बसस्टॉप जवळ वाहनाची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी पांढऱ्या रंगाची इडींका घेऊन चालक व त्याचे साथीदार असे अमोल बावस्कर यांच्याजवळ वाहनासह थांबले.
कोठे जात असल्याचा बनाव करत विचारपूस करताना चालकाच्या साथीदारांनी अमोल बावस्कर यांच्या पॅन्टच्या खिश्यातील रोख २२ हजार ५०० रुपयांची रोकड तसेच दहा हजार किमतीचा मोबाइल असा सुमारे ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. तक्रारीनुसार याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस नाईक प्रदीप चौधरी तपास करीत आहेत.