---Advertisement---
नाकाबंदी दरम्यान पाचोरा जळगाव रोडवरील गोराडखेडा गावापुढे एक लाख २२ हजार रुपये किमतीचा गांजा ताब्यात बाळगून वाहतूक करताना जळगाव येथील दोन संशयितांना पाचोरा पोलिसांनी एक लाख २२ हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेत शनिवारी रात्री अटक केली आहे. या अटकेतील आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा यांच्या आदेशाने आपल्या पोलीस कर्मचारी पथकासह पाचोरा-जळगाव रोडवर तालुक्यातील गोराडखेडा गावाचे पुढे थोड्या अंतरावर नाकाबंदी केली. ३० ऑगस्ट रोजी रात्री १९.५१ वाजताचे सुमारास जळगावहुन पाचोराकडे एक ग्रे रंगाची हुंदाई कंपनीची कार क्रमांक (एमएच-२८-एएन-२०३८) आली.
या गाडीस पोलिसांनी थांबविले असता या गाडीमध्ये एक गाडीचालक व मागील सिटवर एक इसम बसलेला आढळला. त्यांना पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी गाडी चालकास नाव, गाव विचारले त्याने त्याचे नाव शुभम बाबूराव सूर्यवंशी (वय २८, रा. वाघनगर, जळगाव) असे सांगितले व त्याचे मागील सिटवर बसलेला इसम यास नाव, गाव विचारले असता त्याने त्याचे नाव जयेश वसंत गालफाडे (वय २३, रा. वाघनगर, जळगाव) असे सांगितले. त्यांच्या वाहनाची झडती घेतली असता. या गाडीत मागच्या सिटवर दोन प्लॅस्टीकच्या पिशव्या होत्या. त्याची तपासणी केली असता, त्या प्लॅस्टीकच्या पिशवीमध्ये गांजा सदृश अंमली पदार्थ मिळाले.
मुद्देमाल सील करून जप्त करण्यात आला. त्यानंतर दोघांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेण्यात आले. या घटनेबाबत पो. कॉ. जितेश संजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायल हे करीत आहेत.