Leopard Attack :  हृदयद्रावक! आईच्या डोळ्यादेखत बिबट्याने नेले चिमुकल्याला फरफटर

by team

---Advertisement---

 

Leopard Attack : अहिल्यानगर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मजुरीच्या कामानिमित्ताने या भागात आलेल्या एक परिवारासोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा परिवार पत्राचे शेड टाकून वास्तव्यास आहे. तीन वर्षाच्या मुलाल रात्रीच्या सुमारास लघुशंकेसाठी बाहेर आणताच या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला चढवित फरफटत नेले. आईसमोरचं बिबट्याने मुलाला फरफटत जंगलाच्या दिशेने नेले. आईने काळीज पिळवटून टाकणारा हा प्रकार आहे. दुसऱ्या दिवशी सिद्धेश्वरवाडीच्या जंगलात तीन वर्षीय अमनचा केवळ डोक्याचा भाग आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  

काळीज पिळवून टाकणारी हा घटना नगर जिल्ह्यातील पारनेरच्या सिद्धेश्वरवाडी परिसरातील आहे. या परिसरात बिबट्याने तीन वर्षीय अमन खुंटे या चिमुकल्याचा जीव घेतला आहे. अमनला त्याच्या आई समोरचं बिबट्याने फरफटत नेले. सदरचं कुटुंब हे मोलमजुरी करण्यासाठी छत्तीसगड येथून आलेले असून हे परप्रांतीय खुंटे कुटुंब सिद्धेश्वर वाडी परिसरात पत्र्याच्या शेड टाकून राहत होते.

दरम्यान, सोमवारी रात्री अमनला लघुशंका आली. लघुशंकेसाठी त्याला त्याच्या आईने घराबाहेर आणले. आई आणि चिमुकल्या अमनने विचार देखील केला नसेल असं काही धक्कादायक प्रकार घडला. अमनला आई बाहेर घेऊन येताच अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढविला आणि आईसमोर चिमुकल्या अमनला जंगलात फरफटत नेले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे अमनची आई भेदरली. तिने आरडाओरडा केला असता परिसरातील लोक जमा झाले. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. बिबट्या अमनला घेऊन जंगलात निघून गेला. याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली. दरम्यान रात्रभर शोध कार्य करून देखील अमन सापडला नाही.

शोध मोहिम सुरु असताना दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी सिद्धेश्वर वाडीच्या जंगलात अमनचा केवळ डोक्याचा भाग आढळून आला. आजूबाजूला शोध घेतला, मात्र त्याचे धड आढळून आले नाही. याबाबत पोलिसांनी अकस्मात नोंद केली आहे. तर बिबट्याला कैद करण्यासाठी वन भागाकडून हालचाली सुरु करण्यात आल्या आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---