Jalgaon News : सत्ताधाऱ्यांच्या बालेकिल्ल्यांतच शेतकऱ्यांच्या आत्महत्या सर्वाधिक

---Advertisement---

 

कृष्णराज पाटील

जिल्ह्यात दर महिन्याला शेतकरी आत्महत्या होत आहेत. नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतीमालाचे पडलेले दर आदी कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. विशेषतः जळगाव जिल्ह्यात जामनेर, पारोळा अमळनेर तालुक्यांमधील सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्याच क्षेत्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्येच्या नोंदी झाल्याचे वास्तव आहे.

यंदा शेतकरी आत्महत्यासंदर्भात जळगाव जिल्हा आघाडीवर आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२५ दरम्यान गेल्या आठ महिन्यात तब्बल २६६ शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जबाजारीपणासह अन्य कारणांमुळे मरणाला जवळ केले आहे. जळगाव जिल्ह्यात यंदा सर्वात जास्त जामनेर आणि पारोळा तालुक्यात प्रत्येकी ३३ तर त्याखालोखाल अमळनेर, चोपडा आणि चाळीसगाव अशा उतरत्या क्रमानुसार २६६ शेतकरी आत्महत्येची आकडेवारी अंगावर शहारे आणणारी आहे.

योग्य दर, कर्जमाफी, प्रोत्साहन, अनुदानापासून वंचीत

गेल्या दोन वर्षापूर्वी २०२३ मध्ये अत्यल्प पावसामुळे कापूस, सोयाबीनचे उत्पन्न कमी आले. तर शासनाने दुष्काळी मदत अनुदान जाहिर केले. यात काहींना मिळाले तर काही शेतकरी वंचीत राहिले. तसेच २०२४ च्या खरीप हंगामात कापूस, सोयाबीनला दरच मिळाला नाही. यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आले. अतिपावसामुळे ज्वारी रंगहिन झाली, कापसाची बोंडे काळी पडून पानगळ व कवडीयुक्त झाली. तर उडीद, मूग वा अन्य पिक हंगाम हातून गेला. मार्च अखेर पीककर्ज भरता आले नसत्याने कर्जबाजारीपणा वाढला. तसेच शासनाकडून जाहिर होणारी कर्जमाफी ती देखील झालीच नाही. तर काहींना गतकाळात प्रोत्साहन योजनेचा लाभदेखील मिळाला नाही. अशा अनेकविध कारणांमुळे कर्जबाजारीपणाने हताश होवून २६६ शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला.

दाखल पैकी निम्मे मंजूर, १७ प्रस्ताव ऑक्सीजनवर

यात दरमहा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांकडून मदत अनुदान प्रस्ताव दाखल होत असलेतरी २६६ मदत अनुदान प्रस्तावापैकी १४० (सरासरी ५२.६३ टक्के) आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना मदतीचा हात दिला गेला आहे. त्यातही अर्ध्याहून अधिक १०९ सरासरी ४२ टक्के कुटुंबांचे मदत प्रस्ताव अपात्रतेमुळे फेटाळण्यात आले आहेत. याशिवाय १७ मदत प्रस्ताव (सरासरी ६.३९ टक्के) तालुकास्तरावर फेरचौकशीमुळे (ऑक्सीजनवर) प्रलंबीत असल्याचे दिसून येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---