बीव्हीजी कंपनीविरूध्द अधिकाऱ्यांकडून दबावतंत्राचा वापर? संघटनांच्या माध्यमातून तक्रारी दाखल करण्याचा सपाटा

---Advertisement---

 

शहर स्वच्छतेचा मक्ता सप्टेंबरपासून बीव्हीजी या नामांकित कंपनीला सोपविण्यांत आला आहे. या कंपनीला मक्ता घेऊन अवघे ११ दिवस उलटत नाही तोच, विविध संघटनांच्या माध्यमातून तक्रारींचा सपाटा लावून महापालिकेच्याच अधिकाऱ्यांकडून दबावतंत्राचा वापर होत असल्याची जोरदार चर्चा होत आहे.

जळगाव शहरातील स्वच्छता आणि कचरा संकलनाचे काम वॉटग्रेस या कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपुष्टात आली. त्यानंतरही या कंपनीला मुदतवाढ देण्यासाठी अनेकांनी खटाटोप केला. तसेच ज्या बीव्हीजी कंपनीने स्वच्छतेसाठी निवीदा भरली होती, त्यांच्यासमवेत देखिल वॉटग्रेसने न्यायालयीन लढाई लढून मुदतवाढ मिळविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

मात्र बीव्हीजीने न्यायालयीन लढाई जिंकली. त्यामुळे १ सप्टेंबरपासून शहरातील साफसफाई आणि कचरा संकलनाचा मक्ता बीव्हीजीला सोपविण्यात आला. या कंपनीने स्वतःची यंत्रणा उभी करण्याचे काम सुरू केले आहे. स्वच्छतेचा मक्ता घेऊन अवघे ११ दिवस झाले आहे. असे असतांना शहर चकाचक व्हावे अशी अपेक्षा लगेच करणे योग्य नसल्याचे मत काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

संघटनांच्या माध्यमातून दबाव

बीव्हीजी ही कंपनी अत्यंत नामांकित आहे. विविध शासकीय कार्यालयांच्या स्वच्छतेचे काम त्यांच्यामार्फत केले जाते. तसेच अनेक शहरांमध्येही त्यांचे हाऊसकिपींगचे काम आहे. आता जळगावतील स्वच्छतेची जबाबदारी त्यांनी स्विकारली आहे. असे असतांना त्यांचे काम बंद पडावे असाही काही जणांचा अट्टहास होत आहे. यासाठी काही अधिकाऱ्यांनी संघटनांना हाताशी धरून कंपनीविरूध्द तक्रारींचा सपाटा लावल्याची चर्चा होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---