---Advertisement---
जळगाव शहराच्या प्रमुख पर्यटन स्थळ असलेला मेहरूण तलाव आता पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत या तलाव परिसराचा विकास करून जळगाव शहराला एक अद्ययावत वॉटरफ्रंट देण्याचे मोठे पाऊल उचलले जात आहे.
जळगाव शहराच्या हृदयस्थानी असलेला मेहरून तलाव हा शहराचा सौंदर्याचा एक अनमोल ठेवा आहे.
योजनेतील महत्त्वाचे घटक :
- तलावाभोवती फुटपाथ व पदपथ तयार होणार – नागरिकांना चालण्यासाठी, व्यायामासाठी आणि फिरण्यासाठी उत्तम सुविधा.
- परिसराची स्वच्छता व सौंदर्यवृद्धी – हिरवाई, बाग, झाडे आणि आकर्षक लाइटिंग.
- ओपन जिम (Open Gym) – सकाळी व संध्याकाळी फिटनेससाठी नागरिकांना विनामूल्य सुविधा.
- गाझेबो (Gazebo) व लॉन गार्डन – कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आरामदायी जागा.
- कॅफे व रेस्टॉरंट्स – तलावाच्या काठी बसून जेवण व निसर्गसौंदर्याचा आनंद.
- फाउंटन व इलेक्ट्रिफिकेशन – तलाव परिसरात सुंदर फाउंटन व आकर्षक प्रकाशयोजना.
- रेलींग व सुरक्षिततेसाठी उपाययोजना – तलाव परिसर सुरक्षित आणि सर्वांसाठी सोयीस्कर.
- टॉयलेट ब्लॉक व पार्किंगची सुविधा – नागरिकांना व पर्यटकांना सोय. निधी व कामकाज :
या कामासाठी पर्यटन विकास योजनेतून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी अधिकृत Work Order 05/06/2025 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. या टप्प्यात Toilet Block, Fountain, Lawn Garden, Gazebo, Railing व Electrification अशी महत्त्वाची कामे पूर्ण होणार आहेत.
काम पूर्ण करण्याचा कालावधी ३६५ दिवस असा ठरविण्यात आला आहे.
डिझाईन संकल्पना :
या प्रकल्पाची डिझाईन व आराखडा प्रसिद्ध आर्किटेक्ट श्री. शिरीष बर्वे जी यांनी तयार केला आहे. त्यामुळे तलाव परिसराचे रूपांतर केवळ विकास कामातच नाही, तर आधुनिक डिझाईनच्या दृष्टीनेही एक आदर्श प्रकल्प म्हणून होणार आहे.
यामुळे होणारे फायदे :
- जळगाव शहराला संडे इव्हनिंग आउटिंगसाठी एक सुंदर ठिकाण मिळणार.
- कुटुंब, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व तरुण मंडळी यांच्यासाठी नवीन भेटण्याचे व फिरण्याचे ठिकाण.
- शहराच्या पर्यटनाला चालना मिळणार, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी येणार.
या प्रकल्पासाठी माननीय मंत्री श्री. गिरीश महाजनजी, माननीय पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटीलजी, माननीय आमदार श्री. सुरेश भोळे (राजू मामा)जी आणि माननीय खासदार सौ. स्मिता वाघजी यांनी सातत्याने पाठपुरावा करून मोलाचे योगदान दिले आहे.
जळगावकरांनो, आपल्या शहरातील मेहरून तलाव परिसराचा हा बदल म्हणजे जळगावला आधुनिक वॉटरफ्रंटकडे नेणारे एक ऐतिहासिक पाऊल आहे. लवकरच हे






