रिक्षात बसवून प्रवासींचे पैसे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

---Advertisement---

 

प्रवासींना रिक्षात बसविल्यानंतर त्यांच्या पिशवीतील रोकड चोरणारी टोळी सक्रिय होती. एलसीबीच्या पथकाने एका संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर हे बिंग फुटले. टोळीचा म्होरक्याला जेरबंद केले असुन त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. गुन्ह्यातील रिक्षासह रोकड असा सुमारे एक लाख ५३ हजाराचा मुद्देमाल संशयिताकडून हस्तगत केला.

सद्दाम हुसेन बागवान ( रा. भुसावळ) हे गुरुवारी – सप्टेंबर) सकाळी (१८ सहा वाजेच्या सुमारास जळगाव येथुन रिक्षामध्ये बसुन भुसावळ येथे जात होते. त्यांच्या बाजुला बसलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या खिशातील सुमारे २५ हजार रुपये रोख रक्कम चोरुन नेली होती. याप्रकरणी तक्रारीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (१९ सप्टेंबर) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आज सकाळी एलसीबी पथकाला एका संशयिताची गोपनीय माहिती मिळाली. तपासात संशयित शोयब हमीद खान (वय २५, रा. शाहुनगर भिस्ती मोहल्ला जळगाव) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हा गुन्हा त्याच्या दोन साथीदार प्रधुम्न उर्फ बंटी नंदु महाले (रा. खंडेरावनगर, जळगाव), टोनी नाव माहित नाही रा. पिंप्राळा) यांच्या सोबत केल्याची कबुली दिली. ते दोघे फरार आहेत. जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच पध्दतीने (पुर्ण गुन्हा केल्याची कबुली संशयिताने दिली आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक शरद बागल, सफौ अतुल वंजारी, हवालदार अक्रम शेख, हवालदार विजय पाटील, हवालदार उमाकांत पाटील, हवालदार प्रवीण भालेराव, हवालदार मुरलीधर धनगर, पोलीस नाईक किशोर पाटील, पोलीस कॉन्सटेबल प्रशांत परदेशी, कॉन्सटेबल रवींद्र कापडणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या गुन्ह्यात कॉन्सटेबल पंकज खडसे, गौरव पाटील, मिलींद जाधव यांनी तांत्रिक मदत केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---