पाचोरा भडगाव चाळीसगाव तालुक्यांना पावसाने झोडपले, शेतपिकांचे नुकसान, रस्ते, भुयारी मार्ग बंद, जनजीवन विस्कळीत

---Advertisement---

 

जिल्ह्यात रविवारी रात्रीच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. यात विशेषतः पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव तालुक्याला झोडपून काढले. यामुळे शेतशिवारात खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच तितूर, हिवरा, अग्नावती, बहुळा आदी लहान मोठ्या नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर शहरातील भुयारी मार्गासह अन्य सखल नागरी वसाहती भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले.

जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये सरासरी ८७टक्के पाऊस

जिल्ह्यात गेल्या सप्ताहात रावेर, भुसावळ, जामनेर तालुका परिसरात नुकसानकारक पाऊस झाला होता. यात सुमारे ७७ गावातील ११हजार ३७० हेक्टर क्षेत्रातील १४हजाराहून अधिक शेतकऱ्यांच्या खरीप, बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यांचे पंचनामे संपत नाहीत तोवर पावसाने पुन्हा पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव या तीन तालुक्यात खरीप शेतपिकांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ७.८ मिलिमीटर अर्थात ८७.२८ टक्के पाऊस झाला आहे. जळगाव ४.५(७४.९), भुसावळ ११.५(७९.९), यावल१.५(९३.०), रावेर १२.५(७६.५), मुक्ताईनगर ०.७(१४३.४), अमळनेर०.३(३५.९), चोपडा०.२(६९.१), एरंडोल ०.६(८९.०), पारोळा २.८(६१.४), चाळीसगाव २१.७(६५.४), जामनेर ८.८(१७३.७), पाचोरा २३.२(१२३.५), भडगाव २२.६(८५.८), धरणगाव ३.५(३६.२), बोदवड ७.८(७३.४) अशी एकूण ७.८ मिलिमीटर नुसार आतापर्यंत सप्टेंबर महिन्यात सरासरीनुसार ८७.८ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

२ मोठे तर १० मध्यम प्रकल्प ओसंडले

जिल्ह्यात तीन मोठे १४ मध्यम आणि ९६ लघु असे विविध प्रकल्प आहेत. यात गिरणा वाघूर हे दोन मोठे तर अभोरा, मंगरूळ, सुकी, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, बोरी आणि मन्याड असे १० मध्यम सह बहुतांश लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने ओसंडले असून त्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

हतनूर मधून २३ हजार चा विसर्ग

गेल्या २४ तासात हतनूर प्रकल्पात ८ मिमी पावसाची नोंद झाली असून ७६ दशलक्ष घनमीटरची आवक झाली आहे. त्यामुळे आवक पाहता प्रकल्पाचे ६ दरवाजे दीड मीटर ने उघडून २३ हजार ९७५ क्युसेक चा विसर्ग केला जात आहे.

आवक वाढल्याने गिरणातून विसर्ग वाढला

गेल्या सप्ताहात गिरणा पाणलोक क्षेत्र परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आवक घटली होती त्यामुळे गिरणाच्या सहा दरवाज्यातून होणारा विसर्ग कमी करण्यात आला होता. गेल्या 24 तासात गिरणा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला असून 7.51 दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली आहे त्यामुळे प्रकल्पाचे एक दोन चार सहा असे चार दरवाजे तीस सेंटीमीटरने उघडून 5000 क्युसेक चा विसर्ग केला जात असल्याचे गिरणा पाटबंधारे कार्यकारी अभियंता विनोद पाटील यांनी म्हटले आहे.

वाघूरच्या दोन दरवाज्यातून विसर्ग

वाघुर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात दहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे प्रकल्प चांगलं आवक झाली असून प्रकल्पाचे दोन दरवाजे अर्धा सेंटीमीटरने उघडून विसर्ग केला जात असल्याचे वाघूर प्रकल्प अभियंता यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील तीन मोठे १४ मध्यम व ९६ लघु अशा सर्व प्रकल्पात १३०३.४० दशलक्ष घन मीटर नुसार ४६.०२ टीएमसी अर्थात सरासरी ८४.७५ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. तर गेल्या वर्षी याच दिवशी जिल्ह्यातील प्रकल्पात 1326.90 दशलक्ष घनमीटर नुसार ४६.८५ टीएमसी अर्थात ८६.२८% उपयुक्त जलसाठा असल्याची नोंद असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---