---Advertisement---
श्रीनगर येथील प्रसिद्ध दल सरोवराची सध्या स्वच्छता केली जात आहे. ही स्वच्छतामोहीम सुरू असताना सरोवरात ‘ऑपरेशन सिंदूर वेळी मे महिन्यात पाकिस्तानने डागलेले ‘फतेह-१’ क्षेपणास्त्र सापडले. श्रीनगरमधील लष्कराच्या तळांना लक्ष्य करण्यासाठी हे रॉकेट पाकिस्तानने डागले होते. या माध्यमातून पाकिस्तानच्या अपयशाचा आणखी एक पुरावा समोर आला. सापडलेले रॉकेट स्थानिक पोलिसांना सोपवण्यात आले.
या वर्षी पहलगाम येथे निर्दोष भारतीयांवर पाकिस्तानने भेकड दहशतवादी हल्ला घडवला होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने पाकिस्तानच्या विरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम राबवत तेथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. मर्यादित स्वरूपात असले, तरी ही मोहीम अचूक आणि अत्यंत प्रभावी होती. या कारवाईत पाकिस्तानी लष्कराचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. मात्र, भारताने युद्ध वाढू दिले नाही. भारताने कर्म पाहून मारले, असे वक्तव्य राजनाथसिंह यांनी अलीकडेच केले होते.
पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्यासाठी हल्ला केला १० मे रोजी फतेह-१ रॉकेट डागले. हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र ७० ते १०० किमी मारा करू शकते. श्रीनगरमधील भारतीय लष्करी तळाला लक्ष्य करीत डागलेले फतेह अपयशी ठरले.
दल सरोवरात काय झाले?
१० मे रोजी हल्ला : पाकिस्तानी रॉकेट दल सरोवराच्या खोल पाण्यात कोसळले. त्यावेळी पाण्यातून धूर निघताना लोकांनी
पाहिले होते. सरोवराजवळ स्फोटाचा आवाजही ऐकू आला होता. मात्र, कोणतेही नुकसान झाले नाही.
स्वच्छता मोहीम : रविवारी दल सरोवरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यात सहभागी असलेल्यांना क्षेपणास्त्रासारखे प्रक्षेपक सापडले. हे स्फोटानंतर वाचलेले क्षेपणास्त्राचे कवच होते. क्षेपणास्त्राचा हा अवशेष पोलिसांना सोपवण्यात आला.
काय आहे महत्त्व ?
पुराव्याचे महत्त्व : सापडलेल्या क्षेपणास्त्रामुळे पाकिस्तानने हल्ला केल्याचा पुरावा समोर आला. भारतील सैन्याने केलेली कारवाई योग्यच असल्याचेही यावरून सिद्ध झाले.
चोख सुरक्षा : भारताची सुरक्षा व्यवस्था चोख असल्याचेही या माध्यमातून सिद्ध झाले. पाकिस्तानने केलेला हल्ला अपयशी ठरल्याचेही यावरून स्पष्ट झाले.
---Advertisement---