डिजीटल अरेस्ट साफ खोटे, पैसे लुबाडण्याचे सायबर गुन्हेगारांचे रॅकेट

---Advertisement---

 

आर. आर. पाटील

आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यातून दोन कोटी ५० लाख रुपये अतिरेक्यांना पाठविले, तुम्हाला अटक करु असा दम भरत सायबर ठगांनी भुसावळ येथील सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या पत्नीला डिजीटल अरेस्ट केल्याचा बनाव केला. त्यांना १९ लाख ९५ हजार २३७रुपयांचा ऑनलाईन गंडा घालत फसवणूक केली. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीतून अधिन नफा कमविण्याचे अमिष दाखवून जळगाव येथील एका व्यावसायिकाला २.५५ कोटी रुपयांची फसवणूक केली. निवृत्त अधिकारी कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, व्यावसायिक तसेच ग्रामीण भागातील लोकांना लक्ष्य केले आहे. मुळात डिजीटल अरेस्ट हा प्रकार देशात अस्तित्वात नाही. हा पूर्णपणे खोटा बनाव
आहे. आणि ऑनलाईन पैसे लुबाडण्यासाठी सायबर गुन्हेगारांचा फंडा आहे.

खोटे सांगतात रेटुन

डिजीटल अरेस्टला स्वरुप देण्यासाठी सायबर गुन्हेगार साधा कॉल, व्हीडीओ कॉल सुरवातीला ग्राहकाला करतात. हे गुन्हेगार असतात. मात्र ते कस्टम अधिकारी, सीबीआय, ईडी, पोलीस अधिकारी, इन्कम टॅक्स अधिकारी, अमली पदार्थ विरोधी पथक अशी बतावणी करतात. स्वतः किवा कुटुंबातील व्यक्तीने गैरकृत्य केले असुन गंभीर गुन्हा असल्याचा ते आव आणत दम भरतात. त्यांनी खराखुरा अधिकारी वाटावा म्हणून नकली पोषाक घातलेला असतो. ते या फसवणुकीला लुटण्याचे स्वरुप देण्यासाठी गंभीर अपराध सांगत अटकेचा धाक दाखवितात. त्यानंतर डिजीटल अरेस्ट केली, असा बनाव करतात.

आधार कार्डाचा चुकीच्या ठिकाणी वापर, सिम कार्डाचा गुन्ह्यात वापर केला. चुकीचे ट्रान्झीक्शन झाले आहे, असे सांगत फेक एफआयआर करतात. कोणाला सांगु नका, आमच्या समोरुन उठू नका. कॉल बंद करु नका. आम्ही सांगतो त्याप्रमाणे वागा, असे सांगत खोटे कागदपत्र दाखवून दंडाची भीती दाखवितात. यातून आम्ही तुमची सुटका करु असा खोटा बनाव खरा असल्याच्या अर्विभावात संवाद साधतात. या कॉलमुळे सबंधित व्यक्ती विनाकरण भितीखाली येते. कारण काय? डिजीटल अरेस्ट ही गोष्टच भारतात अस्तित्वात
नाही. मात्र या फसवणुकीच्या प्रकारात असंख्य लोकांना फसविले जात आहे. केवळ भीतीमुळे हे सारे घडते आहे.

पोलीस सांगतात सावध राहा

पोलिसाकडून या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. ते म्हणतात अशा प्रकारापासून सावध राहा. पोलीस अधिकारी नागरिकांना कधीही डीजिटल अरेस्ट असा फोन करत नाही. कधीही कोणतही अॅपडाऊनलोड करायला सांगत नाही. आम्ही पोलीस आहोत, हे हे पटवून देण्यासाठी पोलीस कधीही व्हिडीओ कॉल करत नाही. ओळखपत्र, एफआयआर, अटक वॉरट याबद्दल ऑनलाईन
शेअर केले जात नाही. पोलीस अधिकारी कधीही व्हॉईस वा व्हिडीओ कॉलव्दारे जबाब नोंदवून घेत नाही. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत डीजिटल अरेस्टसाठीची कोणतीही तरतूद नाही. म्हणजेच डिजीटल अरेस्ट हा सायबर गुन्हेगारांनी फसवणूक करण्यासाठी अंमलात आणलेला मोठा आर्थिक घोटाळ्याचे षडयंत्र आहे.

खबरदारी हवी

अनोळखी व्यक्तीचा कॉल अथवा व्हिडीओ कॉल उचलू नये. शेअर मार्केटम ध्ये प्रचंड नफा किंवा डिजीटल अरेस्ट असा कोणी बनाव केला तर त्वरीत फोन कट करावा. सायबर पोलीस अथवा जवळच्या पोलीस ठाण्यात यासंदर्भात त्वरीत कळवावे. निनावी फोनवरुन कोणतीही भीती दाखविण्याचा प्रयत्न होत असल्यास त्याची माहिती त्वरीत कुटुंबातील व्यक्ती तसेच पोलिसांना तत्काळ द्यावी. यामुळे म नस्ताप तसेच आर्थिक फसवणूकीच्या धोका होणार नाही.

फसवणुकीचा कट

  • डिजीटल अरेस्ट हे शंभर टक्के फसवणूकीचा कट आहे. नागरिकांनी अमिषाला तसेच कोणत्यातरी फसवणूकीत सहभागी आहेत, असा बनावावर विश्वास ठेऊ नये. अनोळखी लोकांचे फोन घेऊ नये. व्यक्तीगत माहिती कोणांलाही शेअर करु नये. कोणाच्या बाबत असा प्रकार झाला किंवा होत असल्यास त्वरीत सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.
    सतिष गोराडे – पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन, जळगाव

---Advertisement---

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---