Jamner News: जामनेरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिवनपटाचे प्रदर्शन

by team

---Advertisement---

 

Jamner News: देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त जामनेर येथे भाजपा कार्यकर्त्यांच्यावतीने मोदीजींच्या जीवनपटाचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले. यावेळी आपले आदर्श असलेल्या नेतृत्वाचे कर्तृत्व पाहताना आपणास अभिमान वाटला, असे मत मंत्री महाजन यांनी व्यक्त  केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आपल्या जीवनात घेतलेले महत्त्वाचे निर्णय, राबवलेले विविध उपक्रम व देशाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी केलेले अथक प्रयत्न यांची सखोल माहिती या प्रदर्शनात देण्यात आली आहे. या प्रदर्शनास जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन भाजपाकडुन करण्यात आले आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, मंडल अध्यक्ष रविंद्र झाल्टे, जिल्हा सरचिटणीस आतिश झाल्टे,  जितेंद्र पाटील, सुभाष पवार,  जितेश पाटील,  डॉ. पांडुरंग अल्हाट यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

---Advertisement---

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---