Amrut Bharat Express : खूशखबर! उधना ते ब्रह्मपूर अमृतभारत एक्स्प्रेसला सुरु, नंदुरबारमध्ये माजी खा. डॉ. हिना गावित यांनी दाखवली हिरवी झेंडी

by team

---Advertisement---

 

वैभव करवंदकर, नंदुरबार प्रतिनिधी

Amrut Bharat Express , Nandurbar News: उधना ते ब्रह्मपूर अमृतभारत एक्सप्रेस या नवीन रेल्वेगाडीचे २९ सप्टेंबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि रेल मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते लोकार्पण झाले. ही रेल्वे गाडी नंदुरबार रेल्वे स्टेशनवर आली असता संसद रत्न माजी खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांनी हिरवी झेंडी दाखविली. त्यानंतर रेल्वे गाडी पुढे रवाना झाली.

याप्रसंगी, डॉ. हिना गावित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आणि केंद्र सरकारचे आभार मानून पुढे सांगितले की.  देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाण्यासाठी आता नंदुरबार येथून रेल्वे गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. उधना ब्रह्मपूर एक्सप्रेसमुळे त्यात आणखी भर पडली. या नवीन एक्सप्रेसला देखील नंदुरबार येथे थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे येथून थेट जगन्नाथ पुरीला जाण्यासाठी नंदुरबार येथील भक्तगणांची मोठी सोय झाली आहे. ब्रह्मपूर-उधना अमृत भारत एक्सप्रेस ही पाच राज्यांना जोडेल. यात ओडिशा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि गुजरातचा समावेश आहे. ट्रेन क्रमांक १९०२१/१९०२२ उधना-ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस ही साप्ताहीक गाडी आहे.

ट्रेन क्रमांक १९०२१ उधना-ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस ही दर रविवारी सकाळी ७:१० वाजता उधना येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १:५५ वाजता ब्रह्मपूर येथे पोहोचेल. ही सेवा ५ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होईल. ट्रेन क्रमांक १९०२२ ब्रह्मपूर-उधना अमृत भारत एक्सप्रेस ही दर सोमवारी ब्रह्मपूर येथून रात्री ११:४५ वाजता सुटेल आणि २५ ऑक्टोबर २०२५ पासून सकाळी ८:४५ वाजता उधना येथे पोहोचेल, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुहास नाईक, माजी नगरसेवक लक्ष्मण माळी, मोहन खानवाणी, अविनाश माळी यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

---Advertisement---

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---