पाकिस्तानात लष्कराच्या मदतीनेच सरकार चालवले जाते, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली

---Advertisement---

 

देशाचे शासन ‘हायब्रिड मॉडेल’ अंतर्गत चालवले जाते, जिथे लष्कर आणि नागरी सरकार एकत्रितपणे निर्णय घेतात. पाकिस्तानात लष्कराच्या मदतीशिवाय सरकार चालवले जाऊ शकत नाही, अशी कबुली पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका मुलाखतीत दिली आहे.

अमेरिकन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आसिफ म्हणाले, पाकिस्तानच्या शासनात लष्कराचा बोलबाला आहे आणि निर्णय त्यांच्या सहमतीशिवाय घेता येत नाही. अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांना जनरल पदावरील व्यक्तीला बडतर्फ करण्याचा अधिकार आहे; मात्र पाकिस्तानात असे अधिकार नाही.

पाकिस्तानच्या आर्थिक आणि प्रशासकीय समस्या सोडविण्यासाठी ती व्यावहारिक गरज आहे. जरी ही एक आदर्श लोकशाही नसली, तरी सध्याच्या परिस्थितीत ती देशासाठी चांगले काम करत आहे. अमेरिकेशी वाढत्या संबंधांचा चीनशी असलेल्या पाकिस्तानच्या मैत्रीवर परिणाम होईल का असे विचारले असता, आसिफ म्हणाले, चीनशी आमचे संबंध दशकांपूर्वीचे आणि विश्वासार्ह आहेत. चीन हा आमचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार आहे. आमचे हवाई दल, पाणबुड्या आणि अनेक प्रमुख संरक्षण उपकरणे तिथून येतात. चीनसोबतचे आमचे सहकार्य बळकट झाले आहे.

---Advertisement---

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---