---Advertisement---
भावना शर्मा (शाखा व्यवस्थापिका)
जळगाव : भारतीय तंत्रज्ञान संस्थान, IIT Roorkee येथून Executive Post Graduate Certification in Digital Marketing & Analytics पूर्ण करून भावना शर्मा यांनी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. हे यश त्यांच्या व्यावसायिक कौशल्यांचा आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फळ आहे.
IIT Roorkee सारख्या प्रतिष्ठीत संस्थेच्या अल्युमनी बनणे भावना शर्मा यांच्यासाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण आहे. या प्रमाणपत्रामुळे त्यांना SEO, SEM, SMM, Google Ads, Meta Ads, Email Marketing, Analytics, Influencer & Affiliate Marketing आणि AI टूल्स मध्ये प्रावीण्य मिळाले आहे.
व्यावसायिक प्रवास:
भावना शर्मा यांनी आपल्या करिअरची सुरुवात लोकमत मीडिया प्रा. लि. मध्ये मार्केटिंग एग्झिक्युटिव्ह म्हणून केली आणि नंतर Marketing Manager पदापर्यंत वाढ केली. २५ वर्षांहून अधिक अनुभवाच्या प्रवासात त्यांनी ब्रँडिंग, जाहिरात मोहिमा, इव्हेंट्स आणि रिजनल ग्रोथ प्रोजेक्ट्स यशस्वीपणे हाताळले आहेत.
सध्या भावना शर्मा तरुण भारत, जळगावमध्ये शाखा व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत, जिथे त्या संपूर्ण विभागांचे नेतृत्व करत प्रिंट व डिजिटल मीडियाचे स्मार्ट इंटीग्रेशन प्रभावीपणे राबवत आहेत.
व्यावसायिक भूमिकेबरोबरच, भावना शर्मा Arika Digital Media या 360° मार्केटिंग व ब्रँडिंग एजन्सीच्या CEO आहेत, जिथे त्या स्थानिक व राष्ट्रीय क्लायंट्ससाठी डिजिटल, प्रिंट, कंटेंट, इव्हेंट्स आणि एज्युकेशन यामार्फत ब्रँडची ताकद वाढवतात. तसेच, त्यांनी Reframe Connect या प्लॅटफॉर्मची स्थापना केली आहे, जिथे पॉडकास्ट आणि एज्युकेशनल कंटेंटद्वारे लहान शहरातील युवा व प्रोफेशनल्सना मार्गदर्शन व प्रेरणा दिली जाते.
भवना शर्मा यांचे हे यश लहान शहरांतील व्यावसायिक, महिला उद्योजक आणि मार्केटिंग प्रोफेशनल्ससाठी प्रेरणादायी ठरते. त्यांच्या कामगिरीमुळे IIT Roorkee + Digital Marketing चे महत्त्व आणि स्थानिक बाजारपेठेत प्रभावी ब्रँडिंगची क्षमता अधोरेखित होते.
भावना शर्मा म्हणतात:
“IIT Roorkee ची अल्युमनी बनणे माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. या सर्टिफिकेशनमुळे माझ्या डिजिटल मार्केटिंग कौशल्यांना नवे आयाम मिळाले आहेत आणि पारंपरिक व डिजिटल मीडिया यामधील अंतर कमी करण्याची माझी दृष्टी अधिक स्पष्ट झाली आहे.”