---Advertisement---
World Mental Health Day: मानसिक आरोग्य हे एकेकाळी व्यक्तीगत स्वतंत्र संघर्ष म्हणून पाहिली जाणारी गोष्ट आता सामूहिक आणीबाणीच्या पलीकडे जात आहे. समाजात चिंता आणि नैराश्याची समस्या वेगाने वाढत आहे, ही समस्या तरुणांच्या आत्महत्येचे एक प्रमुख कारण बनत आहे. एकट्या अमेरिकेत २०२२ मध्ये आत्महत्यांचे प्रमाण सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले होते. यावरुन एक थकलेला समाज दिसून येतो जो शांतपणे उलगडत चालला आहे. आपल्या मागील कोणत्याही पिढ्यांना उपलब्ध नसलेल्या सुखसोयीं आपल्याजवळ असूनही जगण्यासाठी संघर्ष सुरु आहे. मग आपलं काय चुकत आहे?
विडंबन असे की उपाय पूर्वी वाटत होते तितके गुंतागुंतीचे नाहीत. वाढत्या संशोधनातून असे दिसून आले आहे की ध्यानाचे कार्यक्रम काही रुग्णांसाठी पारंपारिक उपचारांइतकेच प्रभावी असू शकतात. काही संदर्भात, व्यक्तींना साध्या दैनंदिन पद्धतींकडे वळून व्यावसायिक देखरेखीखाली दीर्घकालीन औषधोपचार कमी करता आले आहेत. एकेकाळी पर्यायी किंवा गूढ म्हणून नाकारल्या जाणाऱ्या गोष्टीला आता आधुनिक विज्ञान मान्यता देत आहे – मंदावणे म्हणजे नवीन चमक.
एक साधे उदाहरण – ध्यान हा भारतीय योगगुरूंच्या ज्ञानाच्या समृद्ध संग्रहातून मिळालेला एक प्राचीन काळातील सिद्ध केलेला उपाय अतिविचार करणाऱ्या कमकुवत मेंदूवर पुन्हा एकदा एक संभव असा प्रभावी उपाय बनून पुढे येत आहे. शेवटी, सातत्याने केलेली २००-३०० ध्यान सत्रे गोंधळलेल्या मनावर काय परिणाम करू शकतात हे एखाद्याच्या जीवनातील अनुभवांवर आणि परिस्थितीवर अवलंबून असते. चित्रपटाच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास परिणाम सहसा कधीच नाट्यमय नसतो, परंतु त्याचा प्रभाव निर्विवाद आहे – निवांत झोप, ताणतणावाला शांत प्रतिसाद व युद्धभूमीवर असल्यासारखा आभास न देणारे संभाषण. हे परिवर्तन सूक्ष्म आहे, तरीही गहन आहे.
ध्यानासाठी सद्गुरूंनी डिझाइन केलेले मिरॅकल ऑफ माइंड सारख्या साधने प्रभावी ठरतात. हे ७ मिनिटांचे मोफत ध्यान अॅप, जे ध्यानाला कोणाच्याही व्यस्त दिनचर्येत सहजपणे समाविष्ट करण्यासाठी उपयुक्त आहे. हे डिजिटल प्लॅटफॉर्म आता मानसिक आरोग्याचे लोकशाहीकरण करत आहेत.
ईशा फाउंडेशनसारख्या संस्थांनी अनेक दशकांपासून रचनात्मक कार्यक्रमांद्वारे लाखो लोकांना ध्यानाची ओळख करून दिली आहे, कुठेही वाच्यता न करता एक अमूल्य असा प्रारंभ बिंदू देऊ केला आहे. ध्यान हे बढाई मारण्यासाठीचा एखादा बॅज किंवा व्यापारिक सफलतादेखील नाही. ध्यान एक सराव आहे, खोलवर वैयक्तिक, अनुभवात्मक आणि आजच्या गोंधळलेल्या जगात, एक गरज आहे.
आपल्यासमोर प्रश्न असा आहे की आपला थकलेला समाज ध्यानाला ऐच्छिक आणि अनावश्यक मानेल की आपल्यासाठी ते खूप महत्त्वाचे आणि तातडीचे असेल. ताणतणाव एका रात्रीत नाहीसा होणार नाही. प्रत्येक चिकाटीच्या बाबतीत असे देखील घडू शकते कारण ताण हा तुमच्यासोबत घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम नसून – तो आंतरिक असतो. कामाच्या मागण्याही कमी होणार नाहीत. डिजिटल दबावही कमी होणार नाही. संबंधित व्यक्तींनी जाणीवपूर्वक हस्तक्षेप न केल्यास, हे संकट आणखी गहिरे होईल. ध्यानधारणा हे एक फॅड म्हणून किंवा प्रत्येक आठवड्याच्या शेवटची विश्रांतीची एक सवय म्हणून न स्वीकारता सार्वजनिक आरोग्यासाठी एक औषध म्हणून स्वीकारल्यास आज तणावपूर्ण जीवनाशी झुंजणाऱ्यांसाठी उद्याचा दिवस वेगळा असू शकतो.
दररोजच्या सात मिनिटांच्या स्थिरतेला नैसर्गिक करण्याची वेळ आली आहे. तितकीच, जितकी आपण दररोज हजार पावले चालण्याची, विगन आहाराचे फॅड बाळगण्याची किंवा ‘मला आठ तास झोप हवी’ या अधिकाराची बाब सामान्य ठरवतो.
साधे आणि मोफत उपलब्ध असलेले मिरॅकल ऑफ माइंड अॅप सारखे साधन आहे. याच्या उपयुक्ततेचे पुरावे देखील आहेत. आणि गरज, निश्चितच, निर्विवाद आहे. आवश्यकता आहे ती इच्छाशक्तीची, नेते, प्रभावशाली व्यक्ती व समाजातील प्रत्येकाने एकत्रितपणे कृती करण्याची.
– राहुल आयरे