---Advertisement---
मेष : कौटुंबिक व्यवसायाच्या वाढीसाठी तुमच्या वडिलांचे मार्गदर्शन आणि सहकार्य महत्त्वाचे ठरेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील.
वृषभ : आज तुम्ही खूप दिवसांनी जुन्या मित्रांना भेटाल. गरजेन-सारच पैसे खर्च करा. कामाच्या ठिकाणी काही लोक तुमच्या यशाने जळतील.
मिथुन : कुटुंबात काही अनावश्यक खर्च येतील. ते तुम्हाला करावे लागतील. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल तर ती नक्की पूर्ण करा.
कर्क : व्यवसायात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. भविष्यात तुम्हाला त्याचा फायदा होईल.
सिंह : व्यवसायात वाढ करण्यासाठी केलेले प्रयत्न अयशस्वी होऊ शकतात. त्यामुळे मन अशांत राहील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी धावपळ करावी लागेल. आज तुम्ही धैर्याने आणि बुद्धीने सर्व अडचणी दूर कराल.
कन्या : कामाच्या ठिकाणी तुमच्या अधिकारात वाढ होईल. कौटुंबिक संपत्तीत वाढ होईल. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे सहकार्य आणि आशीर्वाद मिळतील.
तुळ : सासरच्या लोकांकडून नाराजी होऊ शकते. मात्र गोड बोलून परिस्थिती ठीक करा. अन्यथा नात्यात कटुता येऊ शकते. मित्रांमुळे खर्च होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : डोळ्यांची समस्या असल्यास त्वरित उपचार करा. अन्यथा त्रास वाढू शकतो. कर्ज घेणे टाळा. नुकसान होण्याची शक्यता आहे. कुटुंबात तणाव राहील.
धनु : जॉबच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. त्याचे फळ तुम्हाला मिळेल. नातेवाईकांकडून प्रेम आणि आपुलकी मिळण्याची शक्यता आहे.
मकर : व्यवसायात एखादा करार निश्चित झाल्यास तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मोठ्यांच्या मदतीने रखडलेली कामे मार्गी लागतील.
कुंभ : आज तुम्ही खूप व्यस्त असाल. कामासाठी धावपळ करावी लागेल. योग्य निर्णय घेतल्याने फायदा होईल. व्यवसायातील रखडलेली कामे पूर्ण होतील.
मीन : आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. शिक्षणात नवीन संधी मिळतील. कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर थांबा. वेळ चांगली नाही. कुटुंबात समतोल ठेवा. वडिलांकडून मदत आणि आशीर्वाद मिळतील.