जम्मू-काश्मीर भारताचेच, अफगाणिस्तानच्या वक्तव्याने पाकिस्तानचा थयथयाट

---Advertisement---

 

नवी दिल्ली : भारताचेच जम्मू-काश्मीर असत्याचे वक्तव्य अफगाणिस्तानने केल्यानंतर पाकिस्तानचा थयथयाट सुरू झाला आहे. अफगाणिस्तानचे वक्तव्य म्हणजे सुरक्षा परिषदेच्या ठरावाचे उल्लंघन असल्याचा आरोप केला आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्तकी यांनी शुक्रवारी संयुक्त निवेदन जारी केले. जम्मू-काश्मीर भारताचे असल्याचे या निवेदनात नमुद केले आहे. यावर रविवारी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने वक्तव्य जारी करीत अफगाणिस्तानने घेतलेल्या भूमिकेचा निषेध केला.

खनिज, कृषी, क्रीडा क्षेत्रात भारत करणार गुंतवणूक : मुत्तकी

काबूल आणि दिल्ली दरम्यानच्या विमानसेवांची संख्या वाढविणे, दोन्ही देशांमध्ये व्यापाराला बळकटी देण्यासाठी वाघा सीमा खुली करणे आणि खनिज, कृषी आणि क्रीडा क्षेत्रात गुंतवणूक करण्यासंदर्भात भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत झालेल्या चर्चेत सहमती झाल्याची माहिती अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली. यावेळी महिला पत्रकारांची उपस्थिती होती.

झालेल्या मुत्तकी म्हणाले, जयशंकर यांच्यासोबत चर्चेत भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापारासाठी सर्वात जलद आणि सोपा मार्ग असलेली वाघा सीमा उघडण्याची आम्ही विनंती केली, ती मान्य करण्यात आली. त्यांनी पुढे सांगितले, की अफगाणिस्तानचा उलेमा मदरसे आणि दारुल उलूम देवबंदशी खोल संबंध आहे. सध्या अफगाणिस्तानमधील शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये १ कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, ज्यात २८ लाख महिला आणि मुलींचा समावेश आहे.

धार्मिक मदरसे पदवीपर्यंत शिक्षण देतात. त्यांनी मान्य केले की काही क्षेत्रांमध्ये महिलांच्या शिक्षणावर मर्यादा आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की ते शिक्षणाला विरोध करतात. शिक्षण धार्मिकदृष्ट्या निषिद्ध घोषित केलेले नाही, उलट ते पुढील सूचना येईपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---