भारत दाखवणार स्वदेशी तंत्रज्ञानाची ताकद, गुगल मॅपला टक्कर देणार ‘मॅपल्स’

---Advertisement---

 

नवी दिल्ली : भारतामध्ये विकसित करण्यात आलेले ‘मॅपल्स ॲप’ सध्या चर्चेत आले आहे. मॅपमायइंडिया कंपनीने तयार केलेल्या या स्वदेशी ॲपमध्ये व्हॉईस गाइडेड नेव्हिगेशन, रिअल टाईम ट्रॅफिक अपडेट्स आणि हायपर लोकल सर्च अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळेच हे ॲप गुगल मॅपचे तगडे भारतीय पर्याय ठरले आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच स्वतः या ॲपचा वापर करत असलेला एक व्हिडीओ शेअर केला. भारतीयांनी हे ॲप नक्की वापरून पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले. सरकारच्या मते, हे ॲप म्हणजे डिजिटल आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

मॅपल्सचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे, यातील डेटा प्रायव्हसी होय. इतर ग्लोबल ॲप्सप्रमाणे हे वापरकर्त्याचा डेटा विदेशी सर्व्हरवर पाठवत नाही. त्या ऐवजी संपूर्ण माहिती भारतातील सव्र्व्हरवरच साठवली जाते. त्यामुळे डेटा लीक किंवा परकीय निगराणीचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो. लवकरच भारतीय रेल्वेसोबत एमओयू करण्यात येईल. यामुळे रेल्वे स्थानके आणि मार्गाच्या नेव्हिगेशनमध्येही अधिक अचूकता येईल.

ॲपची वैशिष्ट्ये

मॅपल्स ॲपचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा थ्रीडी जंक्शन व्हयू. या फिचरमुळे यूजर्सना उड्डाणपूल, अंडरपास आणि गुंतागुंतीच्या रस्त्यांची थ्रीडी इमेज पाहता येते. ज्यामुळे चुकीच्या रस्त्यावर जाण्याची किंवा अपघाताची शक्यता कमी होते.

यापूवीं गुगल मॅपने अपूर्ण पुलाचा रस्ता दाखवल्याने उत्तरप्रदेशात अपघातात तीन जणांना प्राण गमवावा लागला होता. मॅपल्सच्या या विशेष फिचरमुळे अशा धोक्यांपासून बचाव होण्यास मदत मिळते.

याशिवाय, यात इनडोअर नेव्हिगेशनची सुविधाही आहे, जी मॉल्स किंवा बहुमजली इमारतींमध्ये अचूक मार्ग दाखवते. ही सुविधा बऱ्याचशा आंतरराष्ट्रीय मॅप ॲप्समध्ये मिळत नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---