पाकिस्तानात आंदोलकांचा धुडगूस शिगेला, टीएलपी प्रमुखावरील गोळीबाराने आंदोलन चिघळले

---Advertisement---

 

इस्लामाबाद : पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याविरोधात असलेल्या आंदोलनाल दडपण्यासाठी सोमवारी तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान अर्थात् टीएलपीचा प्रमुख हाफिज साद हुसेन रिझवी यांच्यावर सुरक्षा दलाने गोळीबार केला. त्यात ते जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

संघटनेच्या प्रवक्त्याने रिझवी यांना तीन गोळ्या लागल्याचे तसेच सुरक्षा दलासोबत झालेल्या संघर्षात २५० कार्यकर्ते ठार आणि १५०० जखमी झाल्याचे सांगितले. आंदोलनाचे नेतृत्व करणारे रिझवी यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने आंदोलक संतप्त झाले असून, त्यांनी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद, लाहोर आणि रावळपिंडी या प्रमुख शहरांत धुडगूस घातला आहे.

आंदोलकांनी शासकीय इमारती, पोलिसांची वाहने आणि बसेसची जाळपोळ केली. सुरक्षा दल आणि आंदोलकांमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. टीएलपीच्या प्रवक्त्याने निवेदनात म्हटले की, रिझवी यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या जीवाचे बरेवाईट झाल्यास शरीफ आणि मुनीर यांना गंभीर परिणामांना समोरे जावे लागतील.

सुरक्षा दलाने आतापर्यंत आमचे २५० पेक्षा जास्त कार्यकर्ते आणि नेते मारले आहेत तर, १,५०० पेक्षा जास्त जखमी झाले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. सरकारने कितीही दबाव टाकला तरी, मागे हटणार नसल्याचा इशारा त्यांनी शाहबाज सरकारला दिला.

निदर्शकांच्या हल्ल्यात पाच पोलिस ठार

पोलिस एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात सुरक्षा दल आणि टीएलपीच्या आंदोलकांमध्ये सोमवारी झालेल्या संघर्षात एका पोलिस अधिकाऱ्यासह पाच कर्मचारी ठार झाले, तर १४ पोलिस जखमी आहेत. मुरीदकेमध्ये पोलिसांनी निदर्शकांना रोखण्यासाठी लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर केला. त्यामुळे आंदोलक संतप्त झाले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली. पोलिसांना आतापर्यंत ३०० आंदोलकांना अटक केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---