---Advertisement---
कॅरिओ : भारत एक महान देश आहे आणि त्या देशाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे सर्वांत जवळचे मित्र आहे. त्यांनी शांततेसाठी नेहमीच मला साथ दिली आणि गाझा पट्टीतील संघर्ष थांबविण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा शांतता शिखर परिषदेत मोदींचे कौतुक केले. विशेष म्हणजे यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ उपस्थित होते, त्यांच्याकडे पाह्नच ट्रम्प यांनी उपरोक्त टिप्पणी केली.
इजिप्तच्या शर्म अल-शेख येथे गाझा शांतता शिखर परिषदेला संबोधित करताना ट्रम्प म्हणाले, भारताने संघर्षाच्या काळात जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी वाटाघाटी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गाझातील शांतता करारासाठी पंतप्रधान मोदी यांनी इसायल आणि पॅलिस्टाईन या दोन्ही देशांसोबत समन्वय साधला आणि करारासाठी पुढाकार घेतला. माझे मित्र मोदींनी गाझातील संघर्ष थांबविण्यासाठी माझ्यासोबत अनेकदा फोनवरून संवाद साधला.
भारत-पाकिस्तान संबंधावर शाहबाज यांच्याकडे लक्ष वेधत ते म्हणाले, मला वाटते भारत आणि पाकिस्तान आता लवकरच एकत्र येतील. वर्षानुवर्षाच्या पुढे त्यांनी सांगितले की, रक्तपातानंतर गाझामधील युद्ध संपले आहे. मानवतावादी मदतीचा पुरवठा पूर्ववत झाला आहे, ज्यामध्ये अन्न, वैद्यकीय उपकरणे आणि इतर साहित्याचा समावेश आहे. रक्तपात, द्वेष किंवा दहशतवादाला कोणत्याही परिस्तिथी थारा मिळी नये यासाठी एकत्र जमलो आहे.
गाझाच्या पुनर्बाधणीसाठी मदत करणार
ट्रम्प म्हणाले, गाझाच्या पुनर्बाधणीसाठी अमेरिका आर्थिक मदत करणार आहे. यासाठी यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करावी लागेल. निःशस्त्रीकरण आणि गाझाच्या लोकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी नागरी पोलिस दल स्थापन करणे आवश्यक आहे. गाझातील लोकांसाठी चांगले भविष्य सुनिश्चित करण्यासाठी अमेरिका काम करणार आहे. मी कोणत्याही परिस्थितीत तिसरे युद्ध होऊ देणार नाही. शांतता परिषदेत २० पेक्षा जास्त देशांचे नेते उपस्थित होते.
कीर्तिवर्धन सिंह यांची घेतली भेट
शिखर परिषदेत भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी गाझा शांतता परिषदेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. दोघांमध्ये प्रादेशिक स्थिरता आणि शांतता प्रक्रियेवर चर्चा केली.