जिल्ह्यात निवडणुकांआधीच महायुती फिस्कटली, आता आ. मंगेश चव्हाणांकडून स्वबळाचा नारा

---Advertisement---

 

पाचोरा (प्रतिनिधी) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाआधीच जळगाव जिल्ह्यात महायुती फिस्कटली असल्याचं पाहायला मिळत आहे. पाचोरा-भडगावचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याच जाहीर केलं होतं. त्यांच्या या भूमिकेनंतर भाजपच्या वतीने आमदार मंगेश चव्हाण यांनी तातडीने बैठक घेऊन भाजपही स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे निवडणुका घोषित होण्यापूर्वीच पाचोरा मतदारसंघात युती फिसकटली असून युतीत निवडणुका न लढण्याचा निर्णय घेणारा पाचोरा मतदारसंघ हा राज्यात पहिला ठरला आहे.

आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज पाचोरा येथील निर्मल सीड्सच्या कृषीदालनात चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचोरा-भडगाव मतदारसंघातील आढावा बैठक उत्साहात पार पडली. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची रणनीती, संघटनात्मक बळकटी, तसेच गट आणि कार्यकर्त्यांची भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान आमदार मंगेश चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, “निवडणुका या फक्त राजकीय नव्हे तर विकासाचा आराखडा ठरवणाऱ्या असतात. प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाच्या विचारधारेसह विकासाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावा.” त्यांनी संघटनशक्ती आणि तळागाळातील संवादाचे महत्त्व अधोरेखित करत कार्यकर्त्यांना उत्साहाने कामाला लागण्याचे आवाहन केले.

या बैठकीत काही नव्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेशही आमदार चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. बैठकीत दिलीपभाऊ वाघ, वैशाली सुर्यवंशी, अमोल शिंदे, प्रताप पाटील, अमोल पाटील, मधुकर काटे, सुभाष पाटील, संजय नाना वाघ, गोविंद शेलार, दीपक माने, अनिल पाटील, विनोद नेरकर यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---