---Advertisement---
नवी दिल्ली : निसर्ग हा कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही. ऋतुनुसार झाडे रंग बदलतात याबाबत सर्वांनाच माहिती आहे. आता हवामानानुसार आणि परिस्थितीनुसार सरोवर रंग बदलतात. भारतातील काही सरोवर आहेत जे रंग बदलतात.
बुलढाणा महाराष्ट्रातील जिल्ह्यातील लोणार सरोवर सुमारे ५२ हजार वर्षांपूर्वी एका उल्कापिंडाच्या धडकेमुळे तयार झाले. या तलावाचे पाणी तसे हिरवे होते. मात्र, २०२० मध्ये अचानक याचा रंग गुलाबी झाला होता. संशोधनानंतर यातील शेवाळ आणि मिठाच्या अधिकतेमुळे उन्हाळ्यात पाण्याची पातळे घटते, तेव्हा असा रंग बदलतो.
सोमगो सरोवर
सिक्कीममधील सोमगो सरोवर हवामानानुसार रंग बदलतो. हिवाळ्यात हा तलाव पूर्णपणे बर्फाने गोठतो. उन्हाळ्यात या सरोवराचे पाणी निळ्या आणि हिरव्या रंगाचे दिसते. हा बदल हवामानानुसार होत असावा असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
पॅगोंग सरोवर
लडाखमध्ये १३४ किमी लांब पैंगोंग सरोवर आहे. हा तलाव तसा निळ्या रंगाचा दिसतो. मात्र अनेकदा या सरोवराच्या पाण्याचा रंग बदलतो. या सरोवराचे पाणी राखडी रंगाचे होते. या सरोवराच्या पाण्याचा रंग हा सूर्याची तीव्रता, ढगांचा प्रभाव आणि उंचीवर होणाऱ्या हवामानातील बदलांमुळे बदलतो, असे वैज्ञानिकांचे मत आहे.
सांभर सॉल्ट सरोवर
राजस्थानमध्ये रंग बदलणारा सांभर सॉल्ट सरोवर आहे. हा तलाव त्याच्या खाऱ्या पाण्यासाठी ओळखले जाते. या सरोवराच्या पाण्याचा रंग निळा, जांभळा आणि गुलाबी होतो. पावसाळ्यात या सरोवराच्या पाण्याचे रंग बदलतात. फ्लेमिंगो या तलावाला भेट देतात.
मौनपाट सरोवर
सुरगुजा छत्तीसगडच्या प्रदेशात असलेला मौनपाट सरोवराचाही रंग बदलतो. या सरोवराला सुरगुजा सरोवर असेही म्हणतात. येथील माती आणि पाण्याच्या रचनेत सूर्याची दिशा आणि दिवसाच्या वेळेनुसार वेगवेगळे रंग दिसतात. स्थानिक लोक याला एक रहस्यमय सरोवर मानतात.