रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्यास भारतावर प्रचंड टॅरिफ, डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी

---Advertisement---

 

वॉशिंग्टन : भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली, तर या देशाला प्रचंड टॅरिफचा सामना करावा लागेल. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून रशियाकडून होणारी तेल खरेदी अर्ध्यावर आणली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वस्त केले असल्याचा दावा पुन्हा एकदा त्यांनी केला.

रशियाकडून तेल खरेदी बंद केली नाही, तर भारताला मोठ्या प्रमाणात टॅरिफचा सामना करावा लागेल आणि मला वाटत नाही की असे काही व्हावे, अशी त्यांची इच्छा असेल. रशियाकडून तेल खरेदीबाबत भारताच्या अलिकडच्या टिप्पण्यांबद्दल एअर फोर्स विमानात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर ट्रम्प देत होते.

बाजारातील गरज पूर्ण करण्यासाठी आणि ऊर्जेच्या स्रोतांचे व्यापकीकरण आणि विविधीकरण करीत असल्याचे भारताने मागील आठवड्यात सांगितले होते. तसेच ट्रम्प यांच्याशी मोदींनी चर्चा केल्याचे माहित नसल्याचे परराष्ट्र खात्याने म्हटले होते.

यावर माझा विश्वास नाही

रशियाकडून तेल खरेदी थांबविण्याबाबत चर्चा झाल्यानंतर भारताने अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली असेल यावर माझा विश्वास नाही, असे ट्रम्प यांनी भारताच्या स्पष्टीकरणावर बोलताना सांगितले. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली आहे आणि रशियाकडून तेलखरेदी थांबवली जाईल, असे त्यांनी सांगितल्याचा दावा ट्रम्प यांनी केला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---