खलिस्तानी भारतासाठी नव्हे, कॅनडासाठी समस्या, भारताच्या उच्चायुक्तांची भूमिका

---Advertisement---

 

कॅनडामध्ये सक्रिय खलिस्तानी गटांचे देशांतर्गत आव्हान आणि धोका भारताला नव्हे, तर कॅनडाला आहे, अशी भूमिका कॅनडातील भारताचे उच्चायुक्त दिनेश पटनायक यांनी स्पष्ट केली. कॅनडात दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी भारतीय राजनयिकांचा गुन्हेगारी कारवायांमध्ये हात असल्याचा आरोप फेटाळला.

हा आरोप निरर्थक आणि हास्यास्पद असल्याचे त्यांनी म्हटले. कॅनडा आणि भारतातील अलिकडच्या चर्चामध्ये खलिस्तानी गटांच्या प्रभावासह संपूर्ण सुरक्षा परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले आहे, असे पटनायक यांनी सांगितले. आपण सध्या ज्याबद्दल बोलत आहोत, ते या देशात घडणाऱ्या वेगवेगळ्या सुरक्षा परिस्थितींबद्दल आहेत, असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले.

सुरक्षा परिस्थिती अशी आहे, जिथे लोकांचा एक गट प्रत्यक्षात दहशत निर्माण करीत आहे, नातेसंबंधांना ओलीस ठेवत आहे. आपण त्यांच्याशी कसे वागावे? कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीला आपण कसे सामोरे जावे, असे ते म्हणाले. खलिस्तानचा मुद्दा केवळ भारताची जबाबदारी नाही. ही एक भारतीय समस्या आहे, या नजरेने कॅनडा याकडे पाहू शकत नाही. ही कॅनडाची समस्या आहे.

ही समस्या निर्माण करणारे काही कॅनेडियन आहे, असा युक्तिवाद पटनायक यांनी केला. उच्चायुक्तांना येथे संरक्षणाखाली राहावे लागते, हे मला विचित्र वाटते. मी संरक्षणाखाली आहे, असे त्यांनी खलिस्तानी दहशतवाद्यांकडून मिळणाऱ्या धमक्यांबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---