नंदुरबार जि.प सह पंचायत समितीच्या मतदारयाद्या प्रसिद्धीस नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

---Advertisement---

 

नंदुरबार : येथील जिल्हा परिषद व सहा सार्वत्रिक पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदारयादी प्रसिद्ध करण्यास ४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांनी दिली. नंदुरबार जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदारयादी तयार करण्याचा कार्यक्रम सुरू आहे.

मतदारयादी अधिप्रमाणीत करण्यापूर्वी तिचे प्रारूप यादी, संबंधित निवडणूक विभाग व निर्वाचक गणातील मतदारांच्या माहितीसाठी ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात आली. विधानसभा मतदारयादीवरून ती तयार करताना काही चुका राहित्या असतील, तर त्यासंदर्भात ८ ते १४ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना मागविल्या होत्या. प्राप्त हरकती व सूचना विचारात घेऊन अधिसूचित केलेल्या २७ ऑक्टोबरला विधानसभा मतदारयाद्यांवरून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रभागनिहाय मतदारयाद्या अंतिम व अधिप्रमाणीत करून प्रसिद्ध करण्यात येणार होत्या. निवडणूक विभाग व निर्वाचन गणांच्या छापील अंतिम मतदारयाद्या अधिप्रमाणीत करणे, प्रसिद्ध करणे व त्याच दिवशी अंतिम यादीतील अनुक्रमांकनिहाय, मतदान केंद्रनिहाय यादी अद्ययावत करून प्रसिद्ध करून जिकिरीचे होणार आहे.

त्यामुळे मतदार केंद्रनिहाय मतदारयाद्यांमध्ये चुका व त्रुटी राहण्याची शक्यता आहे. म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी ४ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. म्हणून मतदारयादी प्रसिद्ध करण्यास मुदतवाढ मिळाल्याची उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांनी प्रसिध्दी पत्रकातुन कळविले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---