---Advertisement---
जळगाव : शहरातील तांबापूरा भागातील फुकटपूरा भागात अवैधपैण गुरांची कत्तल करून मांस बाळगणाऱ्या एका तरूणावर एमआयडीसी पोलीसांनी गुरूवारी २३ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता कारवाई केली असून त्यांच्याकडून सुमारे ७० किलो मांस जप्त करण्यात आला. याबाबत सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तांबापूरा भागातील फ कटपूरा या भागात संशयित आरोपी कलीम खान रहिम खान कुरेशी वय ३८ हा तरूण त्यांच्या घराच्या मागे असलेल्या गोडावून मध्ये गुरांची कत्तल करून विक्री करण्याच्या उद्देशाने सोबत ठेवत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने गुरूवारी २३ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता कारवाई केली.
त्यावेळी संशयित आरोपी कलीम खान याच्या घराच्या मागच्या गोडावून मध्ये गुरांची कत्तल करण्यासाठी लागणारे साहित्य तसेच ७० किलो मांस जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी कलीम खान रहीम खान कुरेशी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ मनोज घुले हे करीत आहे.









