---Advertisement---
Paneer Side effects: पनीर हे अनेक खवय्यांची पहिली पसंत असते. पोषक तत्वांनी परिपुर्ण असा हा पदार्थ आहे. त्यामुळे पनीरचे आरोग्याला अनेक फायदे होतात. मात्र पनीर सेवनाचे फायद्यांसह काही तोटे देखील आहे. कदाचित तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटलं असेल, मात्र हे खरं आहे. पनीर आरोग्यासाठी लाभदायक असले तरी पनीरचे जास्त प्रमाणात सेवन आरोग्याला हानी देखील पोहोचवू शकते. चला तर मग जाणून घेऊया पनीरच्या अति सेवनाने कोणते दुष्परिणाम होऊ शकतात.
जास्त पनीर खाण्याचे ‘हे’ आहे नुकसान
पोटाचे विकार
पनीरचे अतिसेवन काही लोकांना खूप नुकसानदायक ठरु शकते. विशेषतः ज्या लोकांना पोटाशी संबंधित समस्या आहे किंवा बद्धकोष्ठता, अॅसिडिटीचा त्रस्त आहे, त्यांनी पचनसंस्था सुरक्षित ठेवण्यासाठी पनीरचा आहारात समावेश करू नये.
उच्च रक्तदाब
उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्या लोकांनी पनीरचे सेवन टाळले पाहिजे. पनीरच्या सेवनाने रक्तदाबाची समस्या वाढते. हे आरोग्यासाठी घातक ठरु शकते.
अन्नातून विषबाधा
ज्या लोकांना अन्नातून विषबाधाची समस्या आहे, त्यांनी पनीरचे सेवन टाळले पाहिजे. कारण यात भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. अशा परिस्थितीत पनीरमुळे समस्या अधिक वाढू शकते.
भूक न लागणे
पनीरचे जास्त सेवन केल्यास मळमळ, डोकेदुखी, भूक न लागणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.
गर्भवती महिला
जी महिला गर्भवती असेल त्या महिलांना पनीरचे अतिसेवन टाळले पाहिजे. कारण पनीरचे अतिसेवन घातक ठरू शकते. त्यामुळे गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पनीरचे सेवन करावे.
(टीप : लेखात दिलेला सल्ला ही सामान्य आणि उपलब्ध माहिती आहे. कोणताही उपाय करून पाहण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा)









