जळगाव जिल्हा गोळीबाराने हादरला, एरंडोलसह जळगावच्या एमआयडीसीतील घटना

---Advertisement---

 

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली गावात सोमवारी ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता गावठी पिस्तूलातून हातातून चुकून फायर झाल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला आहे, तर जळगावातील एमआयडीसीमध्ये अवैध दारू विक्रेत्याने केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान, या गोळीबाराच्या या दोन्ही घटनांनी जिल्हा चांगलाच हादरला आहे.

याबाबत माहिती अशी की, सोमवार, ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास खेडी कढोली गावातील चौकात सोनू उर्फ प्रवीण पुंडलिक बडगुजर आणि जितेंद्र कोळी उभे होते. याचवेळी जितेंद्र कोळी याच्या हातात असलेले गावठी पिस्तूल तो हाताळत असताना अचानक ट्रिगर दाबला गेला आणि बंदुकीची गोळी सुटली. ही गोळी बडगुजर याच्या छातीकडील खांद्यावर लागून तेथेच अडकली. गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आणि परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर जखमी सोनूला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे, तर दुसऱ्या घटनेत जळगावच्या एमआयडीसीमधील जी-सेक्टर परिसरात रविवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास विजेते कंपनीतील कामगार आणि जवळच्या पानटपरी चालकामध्ये झालेल्या वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.

यामध्ये दोन कामगार जखमी झाले होते, त्यापैकी एका कामगाराचा सोमवार, ३ नोव्हेंबर रोजी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राजन शेख रफिउल्ला (वय २०, मुळ रा. आझमगड, उत्तरप्रदेश) असे मयताचे नाव आहे. दुसरा जखमी अहमद फिरोज शेख याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---