---Advertisement---
वॉशिंग्टन : सक्रियपणे अण्वस्त्रांची चाचणी करणाऱ्या देशांमध्ये चीन आणि पाकिस्तानचाही समावेश असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. काही देशांच्या या प्रवृत्तीमुळे अणुचाचणी करणे अमेरिकेसाठी गरजेचे झाले आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.
रशिया, चीन, उत्तर कोरिया आणि पाकिस्तानसारखे देश अणुचाचण्या करीत आहेत, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. अणुचाचण्या रोखून धरणारा अमेरिका हा एकमेव देश असल्याचा दावा त्यांनी केला. रशिया अणुचाचण्या घेत आहे. चीनही घेत आहे. मात्र, हे देश चाचण्यांबाबत अवाक्षरही उच्चारत नाही. आपण एका खुल्या समाजात राहतो. त्यामुळे या चाचण्यांबद्दल बोलत आहोत. इतर देश अणुचाचण्या घेत असतील तर, आपल्यालाही त्या कराव्या लागतील, असे ट्रम्प यांनी मुलाखतीत सांगितले.
उत्तर कोरिया आणि पाकिस्तानही अणुचाचण्या करीत आहेत. त्यामुळे आम्हीही चाचण्या करणार, असे ट्रम्प यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे, रशियाने अलिकडेच अणुसक्षम शस्त्रास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या चाचण्या घेतल्या आहेत. यात पोसायडन अंडरवॉटर ड्रोनचाही
थांबवलेल्या समावेश आहे. या मुद्यावर, तीन दशकांपासून अणुचाचण्या अमेरिका पुन्हा सुरू करणार का, या प्रश्नाला ट्रम्प उत्तर देत होते.
अण्वस्त्रे कशी कार्य करतात हे तुम्हाला पाहावे लागेल, असे ट्रम्प म्हणाले. चाचण्या घेणार असल्याचे रशियाने जाहीर केले आहे. उत्तर कोरिया सातत्याने चाचण्या घेत आहे. इतर देशही त्याच मागनि चालत आहेत. केवळ आम्हीच चाचण्यांपासून दूर आहोत. आता अमेरिकाही इतरांप्रमाणे अणुचाचण्या घेईल, असे त्यांनी सांगितले.
सगळ्यात जास्त अण्वस्त्रे अमेरिकेकडे आहेत, असा दावा ट्रम्प यांनी केला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत अण्वस्त्रांची संख्या कमी करण्याबाबत चर्चा केली. १५० वेळा पृथ्वी नष्ट होईल इतकी अण्वस्त्रे सध्या जगात आहेत, असे ट्रम्प यांनी सांगितले.
जिनपियांग यांच्या भेटीपूर्वीच घोषणा
अमेरिका पुन्हा अण्वस्त्र चाचणी सुरू करेल, अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील महिन्यात केली होती. ट्रम्प यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपियांग यांच्यासोबत कोरियात भेट होणार आहे. या भेटीपूर्वीच त्यांनी ही घोषणा केली. चाचण्यांसाठी तयारी सुरू झाली आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले असले तरी, या कधी होणार याची माहिती त्यांनी दिली नाही.
पाकिस्तानकडे १७० अण्वस्त्रे
पाकिस्तानकडे सध्या जवळपास १७० अण्वस्त्र आहेत, असा संरक्षण आणि शस्त्रास्त्रांशी संबंधित थिंक टँक स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालात म्हटले आहे. भारताकडे जवळपास १८० अण्वस्त्र असल्याचे जानेवारी महिन्यात जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.









