Success Story: प्रेरणादायी! चहा विक्रेत्याचा मुलगा झाला सीए

---Advertisement---

 

Success Story:  परिस्थिती बद्दल रडत बसण्यापेक्षा जिद्द आणि मेहनतीने यश खेचून आणता येतं याचं मुर्तीमंत उदाहरण बोदवड येथे निर्माण झालं आहे. बोदवड येथील बाळासाहेब ठाकरे नगर येथील रहिवासी अनिल प्रभाकर कोकाटे यांचा मुलगा अंकीत  

सीए फायनलची परीक्षा उच्च श्रेणी गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. वडील चहा विक्रेते आणि घरची परिस्थिती जेमतेम असताना अंकीत याने ही परिक्षा उत्तीर्ण करत आई-वडिलांचे स्वप्न साकार केले आहे.

 अत्यंत हलाखालीच्या परिस्थितीमध्ये पंचवीस वर्षा अगोदर मुळगाव टाकरखेडा, ता. मोताळा येथील अनिल प्रभाकर कोकाटे हे उदरनिर्वासाठी बोदवड येथे आले आणि येथे स्थायिक झाले. त्यांना दोन मुलं दोन मुली चारही उच्चशिक्षित आहे स्वतः सातवी पास असलेले कोकाटे यांनी आपल्या मुलांना त्यांच्या व्यवसायाकडे कधी येवू दिले नाही. मुलगा सीए परिक्षा उत्तीर्ण झाल्या आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झडकत आहे. अंकितशी संपर्क साधला असता सीए चार्टर्डअकाऊटेट क्षेत्रात खूप वाव आहे. अभ्यास केला तर सीए परिक्षा उत्तीर्ण होणं कठीण नाही. शिक्षणावर केलेला खर्च सार्थकी लागावा हीच आई-वडिलांचे स्वप्न होते, ते मी पुर्ण करण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---