नेरी बु. येथे मंत्री महाजनांच्या हस्ते विविध विकासकामांचे भुमिपूजन

---Advertisement---

 


जामनेर : तालुक्यातील नेरी बु. येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे या प्रकल्पांच्या माध्यमातून परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास होऊन नागरिकांचे जीवनमान उंचावेल, असा विश्वास मंत्री महाजनांनी व्यक्त केला.

या विकासकार्यांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी स्थानिक नागरिक, जनप्रतिनिधी आणि प्रशासन यांचे सहकार्य अत्यावश्यक असून, नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे या कार्याला अधिक गती मिळेल, असेही त्यांनी सांगितले. या प्रसंगी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

या कामांचे भुमिपूजन
स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासिका ३० लाख रुपये, नवीन वस्ती भागातील रस्ते व गटारी यांचे भूमिपूजन 45 लाख रुपये, पशुवैद्यकीय दवाखाना बांधकाम 47 लाख रुपये लक्ष रुपये, नेरी ग्रामपंचायत इमारत बांधकाम 25 लाख रुपये याप्रमाणे भूमिपूजन कामाचे भूमिपूजन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---