धक्कादायक! नर्सला धमकावत अत्याचार; आक्षेपार्ह व्हिडीओही काढले

---Advertisement---

 

धुळे : शिरपुरातील एका ३२ वर्षीय तरुणाने पीडित परिचारिकेचा (नर्स) आक्षेपार्ह व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. याबाबत शिरपूर शहर पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपी व्यंकटेश दीपक बारी (वय ३२, रा. शिरपूर) याने पीडितेचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ चोरून काढले आणि ते व्हॉट्सअॅप तसेच इन्स्टाग्रामवर व्हायरल केले. त्याच्याच आधारे धमक्या देत तसेच लग्नाचे आमिष दाखवित २ जून ते ६ ऑक्टोबर या पाच महिन्यांच्या कालावधीत शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती केली. तसेच तिच्या जातीविषयी अपमानजनक बोलले. याप्रकरणी आरोपीवर शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकीवरून पडून पत्नी ठार

साक्री तालुक्यातील रायपूर बारीजवळ घडलेल्या अपघातात दुचाकीवर पतीच्या मागे बसलेली पत्नी पडून तिचा मृत्यू झाला. आरतीबाई पगार (वय ४१, रा. साक्री) असे या महिलेचे नाव असून, २२ रोजी सायंकाळी पती नंदकिशोर दगाजी पगार यांच्यासह त्या एमएच १८-एएस ७६९४ क्रमांकाच्या दुचाकीवरून सोनगीरकडून साक्रीकडे येत होत्या.

जावळ्या डोंगराजवळ पगार यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि आरतीबाई खाली पडल्या. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर सुभाष निकम यांच्या तक्रारीवरून, पती नंदकिशोर दगाजी पगार याच्च्याविरुद्ध निजामपूर पोलिस स्टेशनमध्ये ७ रोजी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---