---Advertisement---
मॉस्को : राट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या सूचनेनुसार रशियाने अणुचाचणीची तयारी सुरू केली आहे आणि त्यादिशेने आमचे काम सुरू असल्याची माहिती रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अणुचाचणी करण्याच्या घोषणेला लाव्हरोव्ह यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
लाव्हरोव्ह यांनी प्रसार माध्यमांना सांगितले, अणुचाचणीच्या शक्यतेवर काम सुरू झाले आहे. रशियाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत “राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, गुप्तचर संस्था आणि नागरी विभागांना यासंदर्भात सूचना दिल्या. संबंधित संस्थांनी त्यावर काम सुरू केले आहे. रशिया सध्या तांत्रिक आणि धोरणात्मक पातळीवर मूल्यांकन करीत आहे आणि योग्यवेळी अणुचाचणीची माहिती दिली जाईल. अमेरिकेने अणुचाचणी घेतल्यास आम्हीही करणार आहोत. रशिया कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही.
दरम्यान, ट्रम्प यांनी अलिकडेच अमेरिका तीन दशकानंतर पुन्हा अणुचाचण्या करणार असल्याची घोषणा केली. त्यांनी की, चीन आणि रशियासारखे प्रतिस्पर्धी अणुक्षमता चाचणी करण्याची तयारी करीत असताना अमेरिका मागे राहणार नाही. अमेरिकेच्या निर्णयाने नवीन अणुशस्त्र स्पर्धेची भीती निर्माण झाली आहे.









