---Advertisement---
Dinesh Story : सध्या सोशल मीडियावर मैत्री करणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे, पण एखाद्यावेळी अश्या काही घटना घडतात, ज्याची संबंधित व्यक्ती कल्पनादेखील करत नसते. अशीच घटना समोर आली आहे, जिथे एका तरुणाला शेजारणीला ‘हाय’ असा मेसेज पाठवणे महागात पडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश असे तरुणाचे नाव आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एका शेजारणीला फॉल केलं. काही दिवसांनी संबंधित महिलेनेदेखील दिनेशला फॉल केलं आणि त्याच्या पोस्ट लाईक करत असे. दरम्यान, रविवारी दिनेशने महिलेला ‘हाय’ असा मेसेज पाठवला.
यानंतर त्याने काही वेळ मोबाईल पहिला आणि नंतर शेतात कामावर गेला. दिनेशने तक्रारीत म्हटले आहे की, शेतात पोहोचल्यानंतर काही वेळातच शेजाऱ्याच्या कुटुंबातील काही सदस्य आणि त्यांचे मित्र आले आणि त्याच्यावर हल्ला केला . त्यांनी त्या चे एकही शब्द ऐकले नाही आणि त्याला बेदम मारहाण करत राहिले. घटनेची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि दिनेशला वाचवले.
त्यानंतर त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी दिनेशच्या डोक्याला सात टाके घातले. दिनेशच्या हाताला आणि पायाला फ्रॅक्चर झाले. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की हल्लेखोरांनी तरुणावर काठ्या आणि रॉडने हल्ला केला.
इंस्टाग्रामवर पत्नीला केला मेसेज
महिलेचा पती सूरजने जखमी दिनेशविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली आहे, ज्यामध्ये दिनेशने त्याच्या पत्नीला इंस्टाग्रामवर मेसेज केला होता. त्याने असेही म्हटले आहे की दिनेश पत्नीला त्रास देत होता. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेशातील खंडवा येथील मोघाट रोड पोलिस स्टेशन हद्दीतील अहमदपूर खैगाव गावात ही घटना घडली आहे. पोलिसांनी सूरजची तक्रार देखील नोंदवून घेतलीअसून, या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.









