लखनौतील संघ कार्यालय होते लक्ष्य, गुजरातमध्ये अटक केलेल्या दहशतवाद्यांची कबुली

---Advertisement---

 

अहमदाबाद : गुजरात एटीएसने अटक केलेल्या तीन दहशतवाद्यांच्या चौकशीत महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. एटीएसचे अधीक्षक शंकर चौधरी यांनी सांगितले की, दहशतवाद्यांचे लक्ष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) लखनौतील कार्यालय होते. याशिवाय, दहशतवाद्यांनी अहमदाबादमधील नरोडा परिसर आणि दिल्लीतील आझाद मैदानाच्या आसपासच्या परिसराची रेकी केली आणि त्याच ठिकाणचे फोटो आणि व्हिडीओ काढले.

७ नोव्हेंबर रोजी सकाळी, एटीएसचे शंकर चौधरी आणि के. के. पटेल यांना माहिती मिळाली की हैदराबादहून एक दहशतवादी शस्त्रे घेण्यासाठी अहमदाबादला आला आहे. त्यानंतर, पथकाने हैदराबादचा दहशतवादी डॉ. अहमद मोहिउद्दीन सय्यद याला अदलाज टोल प्लाझा येथून अटक केली.

त्याच्या गाडीतून विदेशी बनावटीची तीन पिस्तुले आणि ३० काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. अहमदला शस्त्रे पोहोचवण्यासाठी आलेल्या उत्तरप्रदेशातील सुहेल आणि आझाद सुलेमान या दोन दहशतवाद्यांनाही गुजरातमधील पालनपूर येथे अटक करण्यात आली आहे. एटीएस सध्या तिघांचीही चौकशी करीत आहे. चौकशीत असे आढळले की, दहशतवादी डॉ. मोहिउद्दीन अडीच महिन्यांपूर्वी अहमदाबादलाही आला होता आणि पैशांचे पॅकेट घेऊन परतला. त्याला पैसे देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे.

एटीएसच्या तपासात असेही समोर आले आहे की, मोहिउद्दीनसाठी शस्त्रे आणणारे उत्तरप्रदेशातील सुहेल आणि आझाद सुलेमानलाा राजस्थानमधील हनुमानगड येथून गुजरातमधील कलोल येथे शस्त्रे आणण्याचा आदेश देण्यात आला होता. हनुमानगड हा पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे. त्यामुळे सीमेपलीकडून ड्रोनद्वारे शस्त्रे त्यांच्याकडे पाठवण्यात आल्याचा संशय आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---