---Advertisement---
जळगाव : जिल्हयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामळे या निवडणुकीसाठी आता सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. काही ठिकाणी युती आघाडी होण्याचं चिन्ह आहे तर काही ठिकाणी सर्वच पक्ष निवडणुका स्वबळावर लढू शकतता, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र या निवडणुकीपूर्वी आता पक्षांतराला वेग आला आहे.
अनेक इच्छुक उमेदवार या पक्षातून त्या पक्षात जाताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. जळगाव शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अण्णा भापसे, जिजाबाई भापसे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
शिंदेंच्या सेनेला बळकटी
ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे शिंदेंच्या सेनेला बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.









