---Advertisement---
जळगाव : एमआयडीसी परिसरातील आर्यवत प्रा. लि. केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नसून, अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी परिसरातील आर्यवत प्रा. लि. केमिकल कंपनीला आज सकाळच्या सुमारास अचानक आग लागली असून, आग इतकी भीषण आहे की आगीचे लोड हे दोन ते तीन किलोमीटर वरून नागरिकांना दिसत आहे.
यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नेमकी आग कशी लागली, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे.
जीवित हानी नाही…
एमआयडीसी परिसरातील आर्यवत प्रा. लि. केमिकल कंपनीला आज, शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली. दरम्यान, कंपनीतील कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून, कुठलीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
आर्यवत प्रा. लि. केमिकल कंपनीला लागलेल्या आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सध्या महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. यानंतर याचे कारण शोधले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे .









