धक्कादायक! वहिनीसोबत अनैतिक संबंध; सख्खा भाऊच बनला वैरी…, नेमकं काय घडलं?

---Advertisement---

 

Extramarital affair : अनैतिक संबंधांतून पत्नीनेच प्रियकरासह पतीची हत्या केली, अश्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे, जिथे वहिनीसोबत असलेल्या अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या सख्खा मोठ्या भावाचा लहान भावानेच काटा काढला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

पोलीस सूत्रानुसार, परमेश्वर तायडे (३०) असे हत्या झालेल्या मोठ्या भावाचे नाव आहे, तर ज्ञानेश्वर तायडे (२८) आणि मनिषा परमेश्वर तायडे (२५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

दीर ज्ञानेश्वर तायडे याचे वाहिनी मनिषा तायडेसोबत अनैतिक संबंध होते. यात भाऊ परमेश्वर तायडे हा अडथळा ठरत होता. दोघांनी परमेश्वर यांना संपवण्याचा प्लॅन आखला. त्यानुसार दोघांनी मध्यरात्री १.०० वाजेच्या सुमारास परमेश्वरला डोक्यात व चेहऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून ठार केले.

पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाला एका प्लास्टिक गोणीत भरले आणि दगड बांधून तलावात फेकून दिले, जेणेकरून तो तरंगणार नाही. दरम्यान, वाहिनी आणि दीराच्या अनैतिक संबंधांची कुणकुण गावकऱ्यांना आधीपासूनच होती, त्यात परमेश्वर हा गावात दिसत नसल्याने संशयाचे वातावरण निर्माण होऊन चर्चा सुरू झाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला असता, तलावात प्लास्टिक गोणीत गुंडाळलेला एक अज्ञात मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून ओळख पटवली असता, तो परमेश्वर तायडे याचा असल्याचे स्पष्ट झाले.

याबाबत मृताचे वडील यांनी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी परमेश्वरची पत्नी मनिषा आणि त्याचा भाऊ ज्ञानेश्वर दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, नंतर दोघांनी अनैतिक संबंधांना परमेश्वरचा असलेला विरोध हे हत्येचे कारण असल्याचे कबूल केले. जालन्याच्या सोमठाणा येथे ही घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण जालना जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.















Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---